

Onion News : येथील बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रावर गुरुवारी (ता. १५) उन्हाळी कांद्याची जम्बो आवक होती. चाळींमध्ये खराब होत असलेला कांदा व खरीप हंगामासाठी पैशांची गरज यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा बाजारात आणण्यास सुरवात केली आहे.
मुंगसे केंद्रावर ५८० ट्रॅक्टर व ५६६ पिकअप अशा एकूण १ हजार १४६ वाहनातून २० हजार क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची आवक होती. सायंकाळी उशिरापर्यंत लिलावाचे कामकाज सुरु होते. (Inflow of 20 thousand quintals of onion in Mungse market nashik news)
तालुक्यासह कसमादेत यावर्षी उन्हाळी कांद्याचे विक्रमी उत्पादन घेण्यात आले. गेल्या सहा महिन्यापासून कांद्याला समाधानकारक भाव मिळत नाही. चांगल्या भावाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कांदा चाळीमध्ये राखून ठेवला आहे.
मध्यंतरी झालेला बेमोसमी पाऊस व गारपिटीमुळे कांद्याचे नुकसान झाले. बदललेल्या वातावरणामुळे अनेक ठिकाणी कांदा चाळींमध्ये सडू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात कांदा विकण्यास सुरवात केली आहे.
खरीप हंगाम तोंडावर आल्याने बियाणे, खते, मजुरी यासाठी पैशांची गरज असल्याने कांद्याची आवक वाढली आहे. मुंगसे बाजारात चांगल्या प्रतीचा कांदा ७७५ ते १ हजार १७७ रुपयांदरम्यान तर मध्यम प्रतीचा कांदा ५७५ ते ७२५ रुपया दरम्यान विकला गेला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
गोल्टी ३४५ ते ५५० तर खाद २०५ ते ३७० रुपयांदरम्यान विकला गेला. सरासरी बाजार भाव ७८५ रुपये होता. शेतकऱ्यांकडून अजून मुबलक प्रमाणात कांदा शिल्लक आहे. त्यामुळे आणखी काही दिवस बाजारातील आवक कायम राहण्याची शक्यता आहे.
कांदा बाजारात येत असल्यामुळे ट्रॅक्टर, पिकअप आदी वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळत आहे. सध्या पाऊस लांबल्याने शेतकरी कांदा विक्रीला प्राधान्य देत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.