

नाशिक : अवकाळी पावसाने शहर-जिल्ह्यात आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रतिकूल वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणाचा परिणाम लहान मुले व वयोवृद्धांवर होण्याची शक्यता असून, ताप-थंडी, खोकल्याचा त्रास त्यांना जाणवू शकतो.
त्यासाठी या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याचा सल्ला वैद्यकीयतज्ज्ञांनी दिला आहे. (Inhospitable environment children elderly suffer Advice from medical experts to boost immunity Nashik)
उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शहर-जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला आहे.
तसेच वातावरणातील कमाल व किमान तापमानातही मोठी घसरण झाली असून, गारठा वाढला आहे. गार बोचरे वारेही वाहू लागले आहेत.
या बदलत्या वातावरणाचा थेट परिणाम आरोग्यावर होतो आहेत. विशेषतः लहान मुलांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊन ताप-थंडीचा त्रास जाणवू लागला आहे. तर वयोवृद्ध वा दम्याचा त्रास असलेल्या रुग्णांच्याही आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आहे.
दोन दिवसांपासून सूर्यप्रकाश नसल्यानेही वातावरण कोंदट झालेले आहे. याचा थेट परिणाम शारीरिक आरोग्यावर होण्याची दाट शक्यता आहे.
रोगप्रतिकारशक्ती वाढवा
प्रतिकूल वातावरण असल्याने वा वातावरणात अचानक गारठा वाढल्याने शारीरिक रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता आहे.
त्यासाठी घरात स्वच्छता राखतानाच लहान मुले, वयोवृद्धांना हळद टाकून गरम दूध दिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. सर्दी-खोकला, थंडी-ताप असल्यास तत्काळ आपल्या डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
"ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे अचानक वाढलेला गारठा, याचा थेट परिणाम लहान मुले व वयोवृद्धांवर होत असतो. अशावेळी त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी आयुर्वेदातील उपाय अमलात आणावेत. थंडी-ताप असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अंगावर दुखणे काढल्यास ते बळावण्याची शक्यता आहे."
- डॉ. प्रतीक भांगरे, एमडी (मेडिसीन), जिल्हा रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.