Innovation : शहरातील ‘ब्लॅक स्पॉट डिडक्शन’ शक्‍य; राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्‍निकच्‍या विद्यार्थ्यांचे यश

Accident Black Spot
Accident Black Spotesakal

Innovation : विविध कारणांनी होणाऱ्या अपघातात रस्‍त्‍यातील ठराविक भागांचे प्रमाण अधिक असते.

या ब्‍लॅक स्‍पॉटबद्दल सर्वसामान्‍य वाहनचालकांना बऱ्याच वेळा माहिती नसते. याबद्दल माहिती व्‍हावी, या उद्देशाने मराठा विद्या प्रसारक समाज संस्‍थेच्‍या राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्‍निकच्‍या विद्यार्थ्यांनी ‘ब्लॅक स्पॉट डिडक्शन’ ॲप विकसित केले आहे.

या माध्यमातून अशा ठिकाणांची माहिती वापरकर्त्यांना मिळण्यास मदत होणार आहे. (Innovation Black spot deduction possible in city Success of students of Rajarshi Shahu Maharaj Polytechnic making app nashik news)

वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्‍याने रस्‍त्‍यावर धावणाऱ्या दुचाकी, चारचाकींची संख्या सातत्‍याने वाढते आहे. अशात वाहतूक कोंडीपासून अन्‍य वेगवेगळ्या स्‍वरुपातील समस्‍यांमध्येही वाढ झालेली आहे.

रस्‍त्‍यातील काही ठराविक भागांमध्ये विविध कारणांनी अपघातांचे प्रमाण अधिक राहाते आहे. या ब्‍लॅक स्‍पॉटबाबत सामान्‍य वाहनचालकांना माहिती होण्याच्‍या उद्देशाने मविप्र संस्‍थेच्‍या तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे.

पदविका अभ्यासक्रमातील तृतीय वर्षातील आयटी शाखेतील विद्यार्थ्यांनी ब्लॅक स्पॉट डिडक्शन प्रकल्प तयार केला आहे. या प्रकल्पाद्वारे वाहतुकीमुळे रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे, अपघातांमुळे होणाऱ्या जीवितहानीचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकेल.

संजीवनी खैरनार, कशिश डांगे, प्रतीक संपाळ, कुणाल साळुंखे या विद्यार्थ्यांनी प्रकल्प तयार केला आहे. प्राचार्य प्रशांत पाटील, प्रकल्प समन्वयक अजित पाटील, मार्गदर्शक स्नेहल राजोळे, विभाग प्रमुख माधुरी पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Accident Black Spot
Success Story : बागलाणच्या दोन लेकींची गगनभरारी! कौतुकाचा वर्षाव

असे काम करते ॲप्‍लिकेशन..

वेब ॲप्लिकेशन व मोबाईल ॲप्लिकेशनचा समावेश केलेला आहे. ॲप्लिकेशनच्या साहाय्याने वापरकर्त्यांना लोकेशन मॅप उपलब्‍ध असेल. संबंधित ब्लॅक स्पॉट क्षेत्रात प्रवेश केल्‍यानंतर त्‍यांना व्हाइस अलर्टद्वारे सावधानतेचा इशारा दिला जाईल.

या तंत्राचा उपयोग पोलिस प्रशासनाला अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी होऊ शकेल. भविष्यात या प्रकल्पाचा वापर नाशिक शहरासोबत अन्‍य शहरातील नागरिकांनादेखील करता येईल. व महिलांच्या सुरक्षिततेसाठी देखील याचा उपयोग करण्याच्‍या दृष्टीने प्रयत्‍न केले जाणार आहेत.

प्रकल्‍प राबविणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी आदींसह शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. लोखंडे यांनी केले आहे.

Accident Black Spot
Technical Education : राज्यात 516 शाळा होणार तंत्रशिक्षण समृद्ध! 10 हजार 594 स्मार्ट क्लासरूम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com