Technical Education : राज्यात 516 शाळा होणार तंत्रशिक्षण समृद्ध! 10 हजार 594 स्मार्ट क्लासरूम

Technical Education
Technical Educationesakal

Technical Education : केंद्र व राज्य शासनाच्या समन्वयाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीबरोबरच तंत्रशिक्षणाच्या प्रसारासाठी पहिल्या टप्प्यात राज्यातील ५१६ शाळांची निवड झाली आहे.

नव्या शैक्षणिक धोरणानुसार या शाळांना अधिकाधिक तंत्रशिक्षण समृद्ध करण्यात येणार आहे. यात दहा हजार ५९४ स्मार्ट क्लासरूम असतील, यात ९७ हजार २४९ शिक्षकांना टॅब्लेट आणि दोन हजार चारशे डिजिटल लायब्ररी असणार आहे. (516 schools in state will rich in technical education 10 thousand 594 smart classrooms nashik news)

या शाळांची पारदर्शकपणे निवड करण्यासाठी pmshrischools.education.gov.in या पोर्टलवर शाळांनी स्वतः अर्ज करून विविध तीन आव्हानांचे टप्पे पार करणे आवश्यक होते. या टप्प्यांमध्ये पात्र ठरण्यासाठी शहरी भागांसाठी ७० टक्के, तर ग्रामीण भागांसाठी ६० टक्के गुण मिळविणे आवश्यक होते. हे टप्पे पार करणाऱ्या शाळांची तज्ज्ञांच्या समितीने निवड केली आहे.

काय सांगते योजना

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि विशिष्ट कालावधीत आदर्श शाळा विकसित करणे तसेच निष्पक्षता, प्रवेश, गुणवत्ता आणि समावेश या पातळ्यांवर सर्वसमावेशक, समर्पित समग्र परिवर्तन घडविण्याचा या योजनेचा उद्देश आहे.

याअनुषंगाने देशभरात एकूण १४ हजार ५०० शाळा निर्माण करण्यात येणार आहेत. ही योजना पाच वर्षांसाठी असेल. या योजनेतील करारानुसार निवड झालेल्या शाळांसाठी ६० टक्के निधी केंद्र शासनाकडून मिळणार असून, राज्य शासनाचा हिस्सा ४० टक्के असेल.

Technical Education
Nashik News : नव्याने उपअभियंता भरतीने जुन्यांच्या पदोन्नतीला ब्रेक! राज्यपत्रित अभियंत्यांना भीती

राज्याने केलेली तरतूद

येत्या आर्थिक वर्षात राज्य शासनाने या योजनेच्या राज्याच्या हिश्‍श्‍यापोटी ९१ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. २०२२-२३ मध्ये आदर्श शाळांसाठी ४७९ कोटींची तरतूद करण्यात आली होती, त्यापैकी २५४ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

पुढील वर्षी मोठ्या बांधकामांसाठी प्राथमिक शाळांसाठी १९९.४० कोटी, तर माध्यमिकसाठी ५६.१२ कोटी इतका निधी ठेवण्यात आला आहे. समग्र शिक्षाअंतर्गत पायाभूत सुविधांसाठी ८६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

तंत्रशिक्षणासाठी पुढचे पाऊल

तंत्रशिक्षणाचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी राज्य शासनामार्फत येत्या शैक्षणिक वर्षात एक हजार ३५१ आयसीटी लॅब, दोन हजार ४० डिजिटल लायब्ररी, दहा हजार ५९४ स्मार्ट क्लासरूम, शिक्षकांसाठी ९७ हजार २४९ टॅब्लेट, १०५ स्टेम लॅब, ५३३ टिंकरिंग लॅब तयार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Technical Education
Dada Bhuse Viral Video: मंत्री दादा भुसेंनी सिनेस्टाईल पकडला पिकअप, समोर आला धक्कादायक प्रकार; व्हिडिओ व्हायरल

या योजनेंतर्गत निवड झालेल्या शाळांच्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी होण्याबरोबरच केंद्राच्या सहकार्याने दर्जेदार शिक्षणासाठी आदर्श शाळा विकसित करण्याचा मुख्य उद्देश ठेवण्यात आला आहे.

तंत्रशिक्षणासाठी मान्यता शाळा (जिल्हा : शाळा संख्या)

नाशिक : २६, पुणे : २३, रायगड : २०, रत्नागिरी : १३, धुळे : ०७, जळगाव : १८, अकोला : ११, अमरावती : १८, छत्रपती संभाजीनगर : ११, बीड : १३, भंडारा : १२, गोंदिया : १३, हिंगोली : ५, लातूर :१३, नागपूर : २१, नांदेड : १८, नंदुरबार : ८, पालघर : ११, परभणी : ११, बुलढाणा : २२, चंद्रपूर : १८, उस्मानाबाद : ९, अहमदनगर : २१, गडचिरोली : १६, कोल्हापूर : १८, सांगली : १४, सातारा : १८, सिंधुदुर्ग : १३, सोलापूर : २३, ठाणे : १४, वर्धा : १३, वाशीम : ७, यवतमाळ : २६. जालना : १२

Technical Education
Unseasonal Rain Damage : कांद्यापाठोपाठ आता द्राक्ष उत्पादकही हतबल! उत्पादन खर्चही फिटेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com