Nashik : आयुक्तांकडून रामकुंड परिसरात पाहणी

Municipal Commissioner Ramesh Pawar and officials while inspecting the problems.
Municipal Commissioner Ramesh Pawar and officials while inspecting the problems.esakal

नाशिक : पावसाच्या संततधारेमुळे (Constant Rain) गोदावरी व उपनद्यांना पूर (Flood) आल्यानंतर नदीकाठी मोठ्या प्रमाणात गाळ व पानवेली जमा झाल्याने त्या तातडीने दूर केल्या जात आहे की नाही, याबाबत महापालिका आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner Ramesh Pawar) यांनी बुधवारी (ता. २०) सकाळी पाहणी केली. (Inspection by NMC Commissioner Ramesh Pawar in Ramkund area nashik Latest Marathi News)

Municipal Commissioner Ramesh Pawar and officials while inspecting the problems.
ओबीसींचे राज्यात राजकीय आरक्षण कायम राहिल्याचा अधिक आनंद : छगन भुजबळ

आयुक्तांनी रामकुंड येथील पार्किंग परिसरात फेरफटका मारून येथील गाळ स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या. रामकुंड भागातील चेंबर उघडे झाल्याने तातडीने बंदिस्त करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

जुने भाजी बाजार, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण येथील पाहणी करून पंचवटी अमरधाम येथे विद्युतदाहिनी करिता जागेची पाहणी करण्यात आली. अमरधाममधील दुरुस्तीबाबत सूचना दिल्या. तपोवनातील कपिला संगम या ठिकाणी पाहणी करून पर्यटनस्थळ विकसित करण्यासंदर्भात सूचना दिल्या.

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रकाश निकम, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, पश्चिम विभागाचे संजय गोसावी, उदय वसावे, दीपक चव्हाण आदी या वेळी उपस्थित होते.

Municipal Commissioner Ramesh Pawar and officials while inspecting the problems.
नळावाटे घरात गटारीचे पाणी; गणेशवाडी परिसरातील महिला त्रस्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com