Nashik ZP News: जिल्ह्यातील रस्त्यांची CEOकडून तपासणी; निकृष्ट दर्जाचे आढळल्यास ठेकेदाराला काळ्या यादीत टाकणार

ZP CEO Ashima Mittal, Nashik News
ZP CEO Ashima Mittal, Nashik Newsesakal

Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून जिल्ह्यातील ग्रामीण भागात होत असलेल्या रस्त्यांच्या कामकाजाबाबत ओरड असताना खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी तपासणी केलेल्या रस्त्यांचे काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसले.

यावर, मित्तल यांनी जिल्ह्यातील रस्त्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या तपासणीत रस्त्यांचे काम हे निकृष्ट आढळल्यास त्या संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले जाणार असल्याचे मित्तल यांनी सांगितले.

यामुळे ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे. (Inspection of roads in district by ZP CEO Blacklist the contractor if found to be substandard nashik)

काही वर्षांपासून जिल्हा परिषद रस्त्यांबाबत तक्रारींचा पाऊस पडत आहे. रस्ते नसताना बिले काढली जात असल्याचे प्रकारही उघड झालेले आहेत. मालेगाव तालुक्यात रस्ता दाखवा अन् पाच लाखांचे बक्षीस मिळवा, असे आवाहनच करण्यात आले होते.

यातच गत आठवड्यात मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी चांदवड तालुका दौऱ्यावर असताना अचानकपणे वडबारे येथील रस्त्याची पाहणी केली. पाहणीत रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे आढळले.

रस्ता बनविताना असलेले नियम डावलण्यात आलेले होते. तसेच, रस्ता तयार करताना विटेची पावडर वापरल्याचे निदर्शनास आले. ८८ लाखांच्या या रस्त्यासाठी ठेकेदाराला आतापर्यंत ५० लाखांचे बिल अदाही करण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ZP CEO Ashima Mittal, Nashik News
Dada Bhuse: प्रत्येक पोलिस ठाण्यात सुरु करा सायबर सेल; दादा भुसेंची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

रस्त्याच्या कामाचे कोणतेही निकष पूर्ण नसल्याचे मित्तल यांनी सांगितले. सन २०२१-२२ मध्ये हा रस्ता हस्तांतरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे रस्त्यासाठीचे पुढील बिल देऊ नये, असे निर्देश देण्यात आलेले आहेत.

चौकशी अहवालानंतर या रस्त्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे मित्तल यांनी स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील इतर ठिकाणीही असे अनेक गैरप्रकार असल्याच्या तक्रारी असल्याने रस्त्यांची तपासणी केली जाणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

"जिल्हा परिषद प्रशासन कोणत्याही ठेकेदाराला पाठीशी घालणार नाही. कामाचा दर्जाला प्रथम प्राधान्य राहणार आहे. या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराची, संबंधित अभियंता आणि गुणवत्ता तपासणाऱ्या सर्वच घटकांची चौकशी केली जाईल. अचानकपणे रस्त्यांची पाहणीही केली जाणार आहे." - आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

ZP CEO Ashima Mittal, Nashik News
Dada Bhuse: प्रत्येक पोलिस ठाण्यात सुरु करा सायबर सेल; दादा भुसेंची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com