Inspirational News : डोंगरकपाऱ्यतील महिलांच्या दूत : फुलाबाई

Fulabai Shevre- Game
Fulabai Shevre- Gameesakal

आयुष्यात आलेली संकटे कितीही कठीण असले तरी आत्मविश्वासाने ते नक्कीच परतवू शकतो, या सकारात्मक विचारांवर वाटचाल सुरू होती. परिस्थितीमुळे शाळेची पायरीही चढू शकले नाही, मात्र समाजाचं देणं लागतो, या भावनेतून डोंगराच्या कडेकपारीत असलेल्या महिलांच्या आत्मसन्मानासाठी लढताना आदिवासी महिलांच्या हक्कांसाठी, सक्षमीकरणासाठी त्या सरसावल्या.

त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वतावरील पाठारवाडी येथील फुलाबाई शेवरे-गमे यांची ही कहाणी... (Inspirational News Ambassador of Women in Dongarkapari Phulabai nashik news)

सागवाडी-चाकोरे (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील माहेरवाशीण व पाठारवाडी येथील रहिवासी असलेल्या फुलाबाई यांचे वडील झावरू शेवरे यांचे पत्नीसह तीन मुले, तीन मुली असं कुटुंब. कष्ट आणि गरीबी पाचवीलाच पुजलेली. रोजच्या मजुरीच्या कामावर कुटुंबाची गुजराण सुरू होती.

झावरू शेवरे यांनी फुलाबाई यांचा विवाह पाठाराची वाडी येथील बाळू गमे यांच्याशी लावून दिला. फुलाबाई यांच्या वाट्याला कष्ट लिहिलेच होते. सासरीही त्यांच्या नशिबी कष्टाशिवाय पर्याय नव्हता.

विकासापासून कोसो दूर असलेल्या पाठाराची वाडीमध्ये सुविधांची आधीच वाणवा, मात्र नशिबी आलेल्या कष्टमय आयुष्याला त्यांनी आकार देण्याचा चंगच बांधला होता.

परिसरासाठी ठरल्या दूत

माहेरी सागवाडी येथील महिलांच्या मदतीने जंगलसंवर्धनसाठी सहभाग असलेल्या फुलाबाई यांना जंगलांचे महत्त्व असल्याने पाठारवाडी येथेही ही चळवळ भक्कम करण्यासाठी पुढाकार घेतला.

महिलांना हक्कांची जाणीव व्हावी, यासाठी त्या नेहमीच पुढाकार घेत राहिल्या. ब्रह्मगिरीवरील पाठारवाडी हे डोंगराच्या टोकावर वसलेलं गाव. गावाचा त्र्यंबकेश्वरशी रोजचा संपर्क असला तरी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

परिसरातील महिलांच्या मदतीने बचत गट स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. जवळच असलेल्या विनायक खिंड आणि पाठारवाडी येथील महिलांच्या मदतीने सुमारे दहा वर्षांपूर्वी बचतगटाची स्थापना केली. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही.

Fulabai Shevre- Game
Nashik News: 68 महसूल सहाय्यकांच्या बदल्या; नाशिकमधील 21 जण गेले जिल्ह्यातील तहसीलमध्ये

बचत गट सक्षम व्हावेत

परिसरातील महिलांमधील समन्वयाचा अभाव आणि आर्थिक साक्षरता नसल्याने परिसरातील बचत गट बंद पडल्याची खंतही त्या बोलून दाखवतात. मात्र बचतगटांची चळवळ अधिक भक्कम करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, यावर त्यांच्या बोलण्यातून भर दिला जात होता.

ब्रह्मगिरी परिसरातील वाड्यांवरील नागरिकांना पाणीटंचाईसह मूलभूत सुविधा नसल्याने येणाऱ्या अडचणी जणू पाचवीलाच पूजलेल्या. डोंगरावरील असलेल्या विनायक खिंड, सुपलीची वाडी, जांभाची मेट,

महादरवाजा, पत्र्याची वाडी, पाठार वाडी यांसह अन्यही वाड्यांना कायमस्वरूपी रोजगार नसल्याने स्थलांतर थांबविण्यासाठी शासनाने लक्ष द्यावे. योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशीही अपेक्षा त्या व्यक्त करतात.

परिस्थिती आणि परिसरातील दैनंदिन अडचणींमुळे स्वतःला अंगठेबहाद्दर म्हणवून घ्याव्या लागलेल्या फुलाबाई गमे यांनी कुटुंबातील मुले राजाराम, प्रतीक यांच्या शिक्षणाकडे लक्ष पुरवत त्यांना शिक्षित करतानाच वाड्यापाड्यांवरील मुलामुलींना फुलाबाई शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

तुटपुंज्या शेती आणि मजुरीवर कुटुंबाला भक्कम करणाऱया फुलाबाई यांनी पतीसह दोन मुले राजाराम, प्रतीक तसेच मुली मीराबाई व यशोदा यांच्यासाठी दोन घास सुखाचे मिळावे, म्हणून आयुष्यात कष्टालाच देव मानले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Fulabai Shevre- Game
Summer Precaution : उन्‍हापासून बचाव करा, आजारांना ठेवा दूर; पारा वाढल्‍याने आरोग्‍याचे प्रश्‍न बळावले

योजनांची अंमलबजावणी व्हावी

आदिवासी कुटुंबांसाठी अनेक योजना शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत नाहीत.

शासन योजना जाहीर करते मात्र सरकारच्या स्थानिक व्यवस्थेकडून या योजना वाड्यापाड्यांवरील आदिवासी बांधवांपर्यंत प्रभावीपणे राबवल्या जात नाहीत. याबाबत संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करण्यासाठी

नियमित प्रयत्न व्हावेत, पण तसे होताना दिसत नाही, अशीही खंत त्या बोलून दाखवतात. परिसरातील आदिवासींच्या समस्या, पाणीटंचाई अथवा स्थानिक योजनांसंदर्भात यंत्रणेकडून वेळोवेळी माहिती पोहोचवण्यासाठी प्रयत्न व्हावेत.

या भागात असलेल्या ऐतिहासिक कुंडांचे पुनरुज्जीवन केल्यास डोंगरावरील वाड्यांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांनाही स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न व्हावेत, अशीही अपेक्षा फुलाबाई व्यक्त करतात.

एकात्मतेचा वारसा टिकवणाऱ्या वाड्या

विकासापासून दूर डोंगरदऱ्यात असलेल्या आदिवासी बांधवांनी जपलेला एकोपा नक्कीच समाजाला दिशा देणारा ठरलाय. कष्टमय आयुष्य जगत असताना वादविवादापासून दूर राहत येथील लोकांनी गुण्यागोविंदाने राहत जपलेली माणुसकीची भिंत नक्कीच समाजमन जपणारी आहे.

शासकीय योजनांना पोचवण्यासाठी सरकारसोबतच संस्थांनी सहभाग नोंदवल्यास नक्कीच परिसराचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही, हेही त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते.

स्वतः अंगठेबहाद्दर असतानाही परिसरातील महिला तसेच मुलींसाठी आपल्या हक्कांची जाणीव करून देण्याबरोबरच सरकारी बाबूंशी प्रसंगी पंगा घेणाऱ्या फुलाबाई यांनी पाठारवाडी परिसरातील प्रश्नांची जाण असलेल्या सदस्या म्हणून उभी केलेली ओळख नक्कीच अभिमानास्पद आहे.

Fulabai Shevre- Game
Nashik News: विकास आराखड्यात आरक्षण अनेक; जमीन खरेदीसाठी पैसा नसल्याने उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नांची गरज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com