Inspirational Story : ओल्या नारळाच्या करंजांनी पोचवले चैत्रालीताईंना सातासमुद्रापार

Chaitratli Amrutkar Dashpute
Chaitratli Amrutkar Dashputeesakal

आयुष्यात परिस्थिती कशीही असली तरी त्यातून नक्कीच मार्ग निघतो, या सकारात्मक विचारांवर अनेक जण स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपड करत असतात.

मनुष्यजन्म एकदाच मिळतो, या उदात्त विचारांनी स्वतःला प्रेरित करतानाच संकटांनाच संधी मानून स्वतःमधील सुगरण बाहेर काढतानाच ओल्या नारळापासून केलेल्या करंजांनी थेट सातासमुद्रापार ओळख उभी केली ती नाशिकच्या महात्मानगर येथील चैत्राली अमृतकर-दशपुते यांनी. (Inspirational Story of Chaitralitai Wet coconuts delivered to abroad nashik)

एम.कॉम., डीटीएलची पदवी घेतलेल्या उच्चशिक्षित चैत्रालीताई यांचे माहेर कळवण तालुक्यातील ओतूर येथील, तर सासर खानदेशमधील भडगाव येथील. वडील रमेश महादेव दशपुते यांचा मुख्य व्यवसाय शेती.

पत्नी विजयासह दोन मुले, एक मुलगी असा परिवार. कुटुंबातील सदस्यांमध्ये चैत्रालीताई तीन क्रमांकाच्या सदस्या. रमेश दशपुते शेतकरी असूनही मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देतानाच संस्कारांचा जणू सारीपाठच घालवून दिला.

चैत्रालीताई बालपणापासूनच हुशार असल्याने त्यांनी स्वतःमधील कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. शिक्षणानिमित्ताने पुण्यात राहून स्वतःला सिद्ध करत राहिल्या. चैत्रालीताईंचा २००८ मध्ये विवाह झाला.

कुटुंबासाठी उभ्या राहिल्या

चैत्रालीताई यांचा विवाह भडगाव येथील सुशांत अमृतकर यांच्याशी झाला. सासरी अमृतकर परिवारही सधन होता. पती सुषांत हेही उच्चशिक्षित होते; मात्र त्यांचाही कल नोकरीकडे नव्हता. त्यामुळे त्यांनीही संगणकीय क्षेत्रात स्वतःची ओळख उभी केली.

नाशिकमध्ये स्थायिक झालेल्या अमृतकर कुटुंबातील चैत्रालीताई यांनीही कुटुंबाची जबाबदारी सांभाळतानाच पती सुशांत यांना मदत करण्यासाठी तयारी दर्शविली. पती सुशांत यांनी सुरू केलेल्या संगणक क्षेत्रातील व्यवसायातही त्या मदत करत होत्या.

Chaitratli Amrutkar Dashpute
Inspirational News : ओमसाई चा जयघोष अन्‌ गरजूंच्या मुखी भोजन; 'तिचा' उपक्रम 3 वर्षांपासून नित्यनेमाने सुरू

कोरोनातून उभे केले कुटुंबाला

अमृतकर परिवाराने अतिशय कष्टाने उभ्या केलेल्या व्यवसायाला कोरोना महामारीचा फटका बसला. कोरोनाच्या लाटेत कुटुंबाने उभ्या केलेल्या व्यवसायाला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.

मात्र याच काळात चैत्रालीताई यांनी पती सुशांत यांना आधार देतानाच नव्याने उभे राहण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परिस्थितीला बसून राहण्याची मुभा नाही, या वाक्यावर ठाम राहत चैत्रालीताईंनी घरगुती व्यवसायांना सुरवात केली.

चैत्रालीताईंनी किचनमधील अगदी खापरावरील मांडे ते थेट वाळवणाचे पदार्थ तयार करून विक्री करण्यास सुरवात केली. याच काळात मुली ध्रिपी व ध्रुवी यांच्यानिमित्ताने कुटुंबातील सदस्यसंख्याही वाढली. नाशिक शहराचा वाढता विस्तार आणि गरज ओळखून गृहिणींना निवडलेल्या पालेभाज्या विक्री सुरू केली.

‘विकली बास्केट’ने दिली ओळख

कोरोनाकाळात नागरिकांना घराबाहेर पडणे शक्य नसताना आठवडाभराच्या भाज्यांचे नियोजन करत निसवलेल्या वेगवेगळ्या भाज्यांचे किट तयार करून ‘विकली बास्केट’ ही संकल्पना चैत्रालीताईंनी सुरू केली.

यातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत गेला. या संकल्पनेला जोड देत खाद्यपदार्थ तयार करून विक्री करण्यास चैत्रालीताईंनी सुरवात केली.

यात तळणाच्या पदार्थांपासून ते घरगुती रेसिपींवर आधारित पदार्थ विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत गेला. खाद्यपदार्थ तयार करताना त्यांनी ओल्या नारळाच्या खोबऱ्यापासून तयार केलेली करंजी घराघरात पोचविण्यास सुरवात केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Chaitratli Amrutkar Dashpute
Inspirational News: सर्वाधिक उंचीवरील शाळा भौतिक सुविधांनी सुसज्ज; कन्सर्न इंडिया फाउंडेशनचे आर्थिक सौजन्य

करंजी पोचली सातासमुद्रापार

कोरोनाच्या काळातील कुटुंबावर ओढवलेल्या परिस्थितीवर मात करतानाच चैत्रालीताई यांनी ओल्या नारळाच्या खोबऱ्यापासून तयार केलेली करंजी नाशिकसह थेट फ्रान्स, अमेरिका, जर्मनी, बँकॉक, दुबई, ऑस्ट्रेलिया येथील वास्तव्यास असलेल्या नाशिकमधील नागरिकांच्या नातेवाइकांपर्यंत पोचवण्यात त्या यशस्वी झाल्या.

प्रारंभी करंजीपासून दिवसाकाठी केवळ साठ रुपये कमवणाऱ्या चैत्रालीताई यांनी तयार केलेल्या करंजीने अमृतकर परिवाराची आर्थिक घडी बसवण्यात यशस्वी ठरल्या आहेत. पती सुशांत यांचेही या कामात मोलाची मदत मिळते आहे.

पॅकिंगपासून ते विक्रीव्यवस्थेत सुशांत यांची त्यांना मदत होत आहे. कोरोनाच्या महामारीतून मार्ग काढतानाच सकारात्मक विचारांच्या पाठबळावर पुढे जाताना आलेल्या अडचणींच्या काळात पती सुशांत, तसेच दशपुते व अमृतकर परिवाराने दिलेल्या पाठबळामुळे करंजीविक्रीतून सातासमुद्रापार स्वतःला नेऊ शकली, असेही त्या सांगायला विसरल्या नाहीत.

Chaitratli Amrutkar Dashpute
Inspirational News : दोन्ही हात गमावूनही आयुष्याच्या लढाईत अव्वल! देशातील पहिले दिव्यांग वाहन परवानाधारक...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com