खेड्यातील तरुणीची प्रेरणादायी कथा; शिपाई ते सहाय्यक लेखा अधिकारी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

success story

खेड्यातील तरुणीची प्रेरणादायी कथा; शिपाई ते सहाय्यक लेखा अधिकारी!

नाशिक : शिकण्याची आणि आयुष्यात काही करण्याची उमेद व जिद्दीच्या बळावर माणूस काहीही करू शकतो, आवश्यक असते ती इच्छा शक्तीची...असेच नाशिक येथील मराठा हायस्कूल मध्ये 10 वी पर्यंतचे शिक्षण, 12 वी पर्यंतचे शिक्षण के.टी.एच.एम.कॉलेज व अमृतवाहीनी कॉलेज, संगमनेर येथे डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेन्टेशन पुर्ण केल्यानंतर एका युवतीने शिपाई ते सहायक लेखा अधिकारी पद मिळवित आपले ध्येय साध्य करून दाखविले आहे.

असा झाला प्रवास

मुळच्या उगांव शिवडी ता. निफाड येथील सीमा जेऊघाले (दिपाली तांबे) ह्या तरुणीने पदवी..... शिक्षणानंतर 2006 मध्ये नाशिक येथील स्थानिक निधी लेखापरीक्षा कार्यालयात शिपाई म्हणून रुजू झाल्या. चार वर्षानंतर सन 2010 मध्ये धुळे येथे प्रमोशन वर क्लार्क पदावर गेल्यानंतर विभागीय परीक्षा देऊन सन 2013 ला स्थानिक निधी लेखापरीक्षा, राहुरी येथे प्रमोशनवर कनिष्ठ लेखापरीक्षक म्हणून हजर झाले, नंतर 2015 मध्ये सहायक लेखा अधिकारी पदाची परीक्षा दिली व सदरची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाल्यानंतर 1 जून 2019 पासून सहाय्यक लेखा अधिकारी या पदावर जिल्हा पुरवठा कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे कार्यरत आहे.

हेही वाचा: नाशिकच्या आर्या बोरसे ने रोवला मानाचा तुरा

परिश्रम कधी वाया जात नाही - दिपाली तांबे

लहानपणापासूनच अभ्यासात व खेळात काही तरी करण्याची जिद्द व वडील बाळासाहेब जेऊघाले यांचे मार्गदर्शन तिला उपयोगी ठरले असल्याचे दिपाली सांगतात. तसेच लग्नानंतर पती भालचंद्र तांबे यांनी दिलेले प्रोत्साहन यामुळे आपण या पदापर्यत पोहचल्याचे त्या सांगतात.

एक शिपाई ते अधिकारी होतांना जो अनुभव आपणास आला त्यामुळे काम करण्यास ऊर्जा मिळते असे दिपाली तांबे यांनी 'सकाळ'शी बोलतांना सांगितले.

कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते .आपण पुढे चालत रहायचे दिशा आपोआप मिळते , घेतलेले परिश्रम कधी वाया जात नाही असा सल्ला त्यांनी युवा वर्गासाठी दिला.

हेही वाचा: आता मुलीच म्हणतात; पसंतीचाच नवरा पाहिजे!

Web Title: Inspiring Journey Of Village Girl From Peon To An Assistant Accountant Officer

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashik
go to top