नाशिक : नाशिकच्या आर्या बोरसे ने रोवला मानाचा तुरा | latest sports news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सूल (जर्मनी) : ज्युनिअर वर्ल्ड कप २०२२ स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणारे भारतीय संघाचे खेळाडू आर्या राजेंद्र बोरसे, जिना किटा व रमिता

नाशिकच्या आर्या बोरसे ने रोवला मानाचा तुरा

नाशिक : जर्मनी (Germany) (सूल) येथे आयोजित ज्युनिअर वर्ल्ड कप २०२२ स्पर्धेत भारताच्या वतीने आर्या राजेंद्र बोरसे, जिना किटा व रमिता या खेळाडूंचा संघाने अव्वल गुण प्राप्त करून फायनलमध्ये प्रवेश मिळविला. शुक्रवारी (ता.१३) झालेल्या फायनल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकाविले. स्पर्धेत कोरिया रजत तर नॉर्वेच्या संघाने कास्य पदक पटकाविले.

नाशिकच्या आर्या राजेंद्र बोरसे हिने शूटिंग हा खेळ सन २०१८ पासून अशोका ॲक्टिविटी स्कूल (अशोका मार्ग) येथील शूटिंग रेंज वरती प्रशिक्षक अभय सुरेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला.

आर्याचा कष्टाळू स्वभाव, चिकाटी व शूटिंग बद्दलच्या महत्वाकांक्षा जाणून तिला वैयक्तिक एअर रायफल घेण्याचा सल्ला दिला. क्षणाचाही विलंब न लावता वडील एन.डी.सी. सी. बँकेचे कर्मचारी राजेंद्र बोरसे यांनी मोठ्या आर्याला वैयक्तिक रायफल घेऊन देत खंबीरपणे उभे राहिले.

प्रशिक्षक अभय कांबळे यांनी तिच्याकडून अथक परिश्रम करून घेतले. तिने सरावात सातत्य ठेवत पहिल्याच प्रयत्नात राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले. पुढे शालेय, राज्यस्तरीय तथा राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक प्राप्त केले. राष्ट्रीय नेमबाजी संघटनेने (नवी दिल्ली) राष्ट्रीय संघ निवड चाचणी २०२२ स्पर्धेमधून तिची ज्युनिअर वर्ल्ड कप २०२२ साठी भारतीय संघात निवड झाली. जर्मनी येथील वर्ल्डकप मध्ये तिने तिची निवड सार्थ ठरविली.

हेही वाचा: बॅडमिंटनमध्ये आज सुवर्ण इतिहास?

आर्याची महत्वाकांक्षा आहे की या स्पर्धांमधून उत्कृष्ट कामगिरी करून तिला ऑलिंपिकसाठी भारतीय संघाकडून खेळून भारताला ऑलिंपिक पदक मिळवून देणे आहे. आर्या तिचे स्वप्न व महत्वाकांक्षा पूर्ण करेल, असा विश्वास आर्याचे आई-वडील राजेंद्र बोरसे व सौ बोरसे आणि प्रशिक्षक अभय कांबळे यांनी ‘सकाळ’ शी बोलताना व्यक्त केला.

हेही वाचा: कस्तुरी सावेकरकडून एव्हरेस्ट सर

Web Title: Indian Team Wins Gold In Final Of Junior World Cup 2022 In Germany Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IndiaNashiksportsGermany
go to top