NMC Cat Sterilization : शहरात भटक्या मांजरांचे होणार निर्बीजीकरण; महापालिकेला सूचना

Cat Sterilization
Cat Sterilizationesakal

Nashik News : राज्याच्या मानवी हक्क आयोगाने भटक्या मांजरांचीदेखील नसबंदीची शस्त्रक्रिया करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. (Instructions given to Municipal Corporation to perform sterilization surgery on stray cat nashik news)

भटक्या श्वानांची संख्या लक्षात घेऊन निर्बीजीकरण करण्याच्या सूचना आहे. ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनानुसार दरवर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांना एजन्सी नियुक्त करणे बंधनकारक आहे.

नाशिक महापालिकेमध्ये 2007 पासून श्वान निर्बीजीकरण प्रक्रिया राबविली जाते. आतापर्यंत महापालिका हद्दीमध्ये एक लाख तीन हजार भटक्या श्‍वानांवर निर्भीजीकरणाचे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर राज्य मानवी हक्क आयोगाने सुमोटो दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सरकारला भटक्या मांजरांचा उपद्रव लक्षात घेऊन निर्बीजीकरण लसीकरण करण्याचे सूचना दिल्या.

मांजरांची नसबंदी आणि लसीकरण करण्यासाठी महापालिका नगरपरिषद व नगरपंचायतींना भारतीय प्राणी कल्याण मंडळाची मान्यता असलेली खासगी एजन्सी नियुक्ती करावी लागणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Cat Sterilization
ZP School Teacher Transfer : नाशिक जिल्हा परिषदेतील 6व्या टप्यातील शिक्षकांना न्यायालयीन दिलासा

सदर एजन्सीला प्राणी जन्म नियंत्रण कार्यक्रमाचा तीन वर्षाचा अनुभव असणे बंधनकारक राहील. नसबंदीसाठी पुरेशी जागा, शस्त्रक्रिया गृह, मांजरीसाठी शस्त्रक्रियेनंतरची काळजी, दवाखाना, स्वयंपाक घर, गोदाम, मांजरीचे वाहतूक करण्यासाठी वाहन व पात्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती असणे आवश्यक आहे.

भटके मांजरे पकडण्यासाठी पथके

भटक्या मांजरांना पकडण्यासाठी नियुक्त केलेल्या एजन्सीमार्फत पथके तयार केले जाणार आहे. सापळा पकडून मांजरीना पकडले व निर्बीजीकरण केंद्रात आणून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे काम एजन्सीचे राहणार आहे. औषधोपचार व आहाराची व्यवस्थादेखील एजन्सीला करावी लागणार आहे.

विहित कालावधीनंतर जेथून मांजर पकडले तेथे पुन्हा सोडून देणे बंधनकारक आहे. यासाठी प्रतिमांजर दोन हजार रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मांजराच्या पिल्लावर व गर्भवती मांजरावर शस्त्रक्रिया करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Cat Sterilization
Gram Panchayats Bypoll Election : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 30 उमेदवारी अर्ज दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com