Nashik News : सप्तश्रृंग गडावरील कर्मचारी, ग्रामस्थांना सुरक्षाकवच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik News: health security cover provided to Saptshring Niwasini

Nashik News: सप्तश्रृंग गडावरील कर्मचारी, ग्रामस्थांना सुरक्षाकवच!

Nashik News : श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे सर्व कर्मचारी, सेवक व पुजाऱ्यांसह सप्तशृंगगडावरील ग्रामस्थांना आरोग्य सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे.

यासंदर्भात ट्रस्टने बुधवारी (ता.१८) येथील प्रसिद्ध सुयश हॉस्पिटलसोबत सामंजस्य करार केला आहे. (Insurace policy of Saptshrungi devi gad staff and villagers Nashik News)

ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधिश वर्धन देसाई व सुयश हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. हेमंत ओस्तवाल यांनी बुधवारी (ता.१८) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या करारांतर्गत गडावरील सर्व नागरिकांना आरोग्यकार्ड दिले जाईल व त्या माध्यमातून आरोग्य शिबिरांमध्ये मोफत निदान, तसेच रूग्णालयामध्ये दाखल करण्याची वेळ आल्यास सवलतीच्या दरात उपचार केले जातील.

करारावर ट्रस्टतर्फे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे आणि हॉस्पिटलतर्फे डॉ. ओस्तवाल यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

ट्रस्टचे विश्‍वस्त व तहसीलदार बंडू कापसे, ॲड. ललीत निकम, ॲड. दीपक पाटोदकर, डॉ. प्रशांत देवरे, मनजोत पाटील, भूषणराज तळेकर, भगवान नेरकर, सरपंच रमेश पवार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजय दुबे, हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत पाटील, डॉ. प्रदीप पवार, डॉ. भास्कर शेलार, डॉ. यतींद्र दुबे, डॉ. हिरालााल पवार, डॉ. मनिष बागरेचा, डॉ. पुजा ओस्तवाल-महाडिक, डॉ. सचिन महाडीक, डॉ. पुष्पक पलोड यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: Dhule News : वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त गावासाठी शवपेटी; निवृत्त प्राचार्यांचे दातृत्व

या करारांतर्गत सप्तशृंगगड येथील ४० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले स्त्री-पुरूष यांच्यासाठी गडावर होणाऱ्या शिबिरांमध्ये मोफत तपासणी करण्यात येईल. गडावरील दहा वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व मुली, महिलांसाठी मासिक पाळीसंदर्भात निशुल्क आरोग्य विषयक शिबिर घेतले जातील.

तंबाखूमुळे होणाऱ्या मौखिक व अन्य सर्व प्रकारचे कर्करोग होऊ नये यासाठीही शिबिर घेतले जाईल.

या व्यतिरिक्त अन्य सर्व आजारांसंबंधी ट्रस्टचे कर्मचारी, ग्रामस्थ स्त्री-पुरुष यांना सवलतीच्या दरात तसेच प्रसंगी निशुल्क आरोग्य सेवा पुरविल्या जातील. आरोग्य तपासणीनंतर प्रत्येकाला आरोग्य कार्ड वितरीत केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

हेही वाचा: Food Security Scheme : दिंडोरी तालुक्यात अन्नसुरक्षा योजनेंतर्गत डिसेंबरपर्यंत धान्य!

निरामय आरोग्य वर्कशॉप

ट्रस्टचे सर्व कर्मचारी, ग्रामस्थ आजारी पडू नये, मात्र आजारी झाल्यास तातडीने कसे बरे व्हावे, याविषयी डॉ. ओस्तवाल यांचे संपूर्ण भारतभर गाजलेले ‘निरामय आरोग्य’ हे अर्ध्या दिवसाचे वर्कशॉप घेतले जाणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी सांधे दुखू नयेत किंवा सांधे बदलण्याची वेळच येऊ नये याविषयीही शिबीर घेतले जातील. त्यात, हाडांची घनता चाचणी गडावरच निशुल्क केली जाईल.

तसेच, रूग्णांना रूग्णालयात भरती केल्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचारासाठी येणाऱ्या खर्चात तीस टक्के सवलत दिली जाणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.

हेही वाचा: Food Security Scheme : दिंडोरी तालुक्यात अन्नसुरक्षा योजनेंतर्गत डिसेंबरपर्यंत धान्य!