Dhule News : वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त गावासाठी शवपेटी; निवृत्त प्राचार्यांचे दातृत्व

Dhule News
Dhule Newsesakal

म्हसदी : लोणखेडी (ता. धुळे) येथील निवृत्त प्राचार्यांनी वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त गावासाठी शवपेटीची सुविधा उपलब्ध करून दिली असून, शवपेटीत पार्थिव काही तास ठेवता येणार असल्याने गावाची सोय झाली आहे. शनिवारी (ता. १४) शवपेटीचे लोकार्पण करण्यात आले.

Dhule News
Dhule News : मोबाईल टॉवर कंपन्यांकडे साडेतीन कोटी थकीत; महापालिकेकडून नोटिसा

धुळेस्थित मूळचे लोणखेडी (ता. धुळे) येथील निवृत्त प्राचार्य‌ डी. के. पाटील व पत्नी नलिनी डी. पाटील यांनी वडील कौतिक यादव पाटील यांच्या ३९ व्या स्मृतिदिनानिमित्त गावासाठी सामाजिक बांधिलकीतून शवपेटी उपलब्ध करून दिली असून, शनिवारी सकाळी ग्रामपंचायत प्रशासनाकडे शवपेटी सुपूर्द करण्यात आली.

दुपारी शालेय विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले. रात्री प्रकाश महाराज शिंदखेडकर यांचे कीर्तन झाले. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शवपेटीचे लोकार्पण करण्यात आले.

Dhule News
Succes Story : अन्न नव्हते, छत नव्हते, पण आत्मविश्वास होता म्हणून झाले पोलिस

गै‌‌रसोय दूर होणार..!

ग्रामीण भागातील मृतांवर अंत्यसंस्कार करताना अनेक समस्या उभ्या राहतात. संबंधित कुटुंब दुःखात असते. अशा वेळी शवपेटीत पार्थिव काही तास ठेवता येणार आहे. लोणखेडी मोठे गाव असून, यापूर्वी येथे शवपेटीची सुविधा नव्हती. निवृत्त प्राचार्य पाटील यांनी शवपेटी उपलब्ध करून दिली आहे. यामुळे ग्रामस्थांनी उपक्रमाचे कौतुक केले.

निवृत्त शिक्षणाधिकारी अमृत नेरकर, महेंद्र पाटील, डी. के. पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. विधायक उपक्रम राबविल्याने ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करण्यात आले.

हेही वाचा: शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

या वेळी गटनेते राकेश पाटील, सरपंच अरुणाबाई नेरकर, उपसरपंच मधुकर पाटील, ग्रामपंचायतीचे सदस्य, निवृत्त प्राचार्य डी. के. पाटील, नलिनी पाटील, सुनंदा भास्कर देवरे (म्हसदी), अमृत नेरकर, सुनील पाटील, रामकृष्ण पाटील, महेंद्र पाटील, भावराव पाटील, भिकन पाटील, सुनील पाटील, ओंकारतात्या पाटील, शिक्षक किसन माळी, अनिल पाटील, भूषण पाटील, बबलू पाटील, पुरोहित चंदू पाठक, सुरेखा खैरनार, वंदना पाटील, भारती पाटील उपस्थित होते.

Dhule News
Success Story : वडिलांची स्वप्नपूर्ती करत निफाडचा चैतन्य बनला Indigoमघ्ये पायलट!

''सामाजिक बांधिलकीतून गावासाठी विधायक उपक्रम राबविण्याचा मानस आहे. वडिलांचे नित्य स्मरण राहावे म्हणून व मृत व्यक्तीच्या पार्थिवाची हेळसांड होऊ नये म्हणून शवपेटी उपलब्ध करून दिली आहे.'' - डी. के. पाटील, निवृत्त प्राचार्य, लोणखेडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com