Crime
sakal
मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोविंदनगर परिसरात मध्यरात्रीच्या वेळी अज्ञात कारच्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला होता. पोलिसांनी नेहमीप्रमाणे कार अपघात दाखवून नोंद केली. या घटनेच्या तब्बल दीड वर्षाने तो अपघात नसून खून असल्याची बाब समोर आली. कोट्यवधींच्या विम्याची रक्कम लाटण्यासाठी मित्रांनीच कटकारस्थान करीत विमाधारकाचा खून केल्याचे तपासातून समोर आले.