त्र्यंबकेश्वर येथे नित्यानंद राय यांच्या उपस्थितीत ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ संपन्न

‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ संपन्न
‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ संपन्नesakal
Updated on

नाशिक : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या प्रमुख उपस्थितीत आज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर येथे आठवा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ संपन्न झाला. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. राय यांनी व योग विद्या गुरुकुलचे अध्यक्ष डॉ. विश्वास मंडलिक यांनी उपस्थितांना योग दिनानिमित्त संबोधित केले.

यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, अपर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, उपजिल्हाधिकारी निलेश श्रींगी, प्रांताधिकारी तेजस चव्हाण हे उपस्थित होते.

‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ संपन्न
आंतरराष्ट्रीय योग दिन : केंद्रीय गृहराज्यमंत्री त्र्यंबकेश्वर येथील योग शिबिरात; पहा Photos

सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या वतीने आणि नाशिक जिल्हा प्रशासन, योग विद्या गुरुकुल आणि श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ट्रस्ट यांच्या सहकार्याने मंदिर परिसरात आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी योग विद्या गुरुकुल चे योगशिक्षक देविका भिडे, सारिका धारणकर आणि विष्णू ठाकरे योगासनांची प्रात्यक्षिक सादर केली. योग साधक पौर्णिमा मंडलिक यावेळी योगाचे महत्व विशद करणारे एक योगगीत सादर केले. योग विद्या गुरुकुल साधक यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांनी सामूहिक योगासनात आपला सहभाग नोंदविला.

‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ संपन्न
जागतिक संगीत दिन : संगीताची आवड जोपासणारा अवलिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The Dodheshwar Road Project in Baglan has sparked controversy over the alleged misuse of ₹7 crore in public funds.
Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.
Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
Marathi News Esakal
www.esakal.com