शहर वाहतूक पोलिसांकडून चौकशी सुरू; स्मार्ट रोडलगतच्या दुकानदारांना दिली तंबी | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic Police in Action

शहर वाहतूक पोलिसांकडून चौकशी सुरू; स्मार्ट रोडलगतच्या दुकानदारांना दिली तंबी

नाशिक : मेहेर सिग्नल ते अशोक स्तंभ या स्मार्ट रोडलगत असलेल्या विक्रेत्यांसमोर गर्दीमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने, या व्यावसायिकांना शहर वाहतूक पोलिस शाखेकडून नोटिसा बजावत तंबी देण्यात आली.

दरम्यान, नो- पार्किंगमधील दुचाकी उचलून घेऊन जाणाऱ्या वाहतूक पोलिस शाखेच्या वाहनावरील कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या गैरवर्तनाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. (Investigation by city traffic police begins Nashik Latest Marathi News)

मेहेर सिग्नल ते अशोक स्तंभ या स्मार्ट रोडवरील वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. येथील वाहतूक कोंडीला वाहनचालक त्रस्त झाले आहेत. यामध्ये भर पडते ती स्मार्ट रोडलगत असलेल्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांची.

वाहतूक पोलिस शाखेकडून बेशिस्त पार्क केलेल्या दुचाकीवर कारवाई केली जाते. मात्र, कारवाई करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांकडून गैरप्रकार होत असल्याची बाब दोन दिवसांपूर्वी ‘सकाळ’ने उघडकीस आणली. ‘वडापाव द्या अन् दुचाकी जागेवर सोडवा’ या वृत्ताची गंभीर दखल शहर वाहतूक पोलिस शाखेने घेतली आहे.

हेही वाचा: ‘त्या’ शिक्षकावर कारवाई करा : सायली पालखेडकर

यासंदर्भात वाहतूक शाखेने स्मार्ट रोडवरील खाद्यविक्रेत्यांना दुकानांसमोर ग्राहकांना वाहने पार्क न करण्याची तंबी देत नोटिसा बजावल्या आहेत.

त्यामुळे या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. त्याचप्रमाणे, वाहनांची टोइंग करणाऱ्या ठेकेदाराकडील कर्मचाऱ्यांनाही तंबी देत नो- पार्किंगमधील दुचाकी उचलल्यानंतर वाहनमालक जागेवर दंड भरण्यास तयार असेल तर जागेवर वाहन द्यावे अन्यथा जुने पोलिस आयुक्तालयात वाहन जमा करण्याचे सूचना दिल्या आहेत. तसेच, गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ठेकेदाराने काढून टाकण्याच्या सूचना वाहतूक शाखेकडून देण्यात आल्याचे समजते.

हेही वाचा: बांधकाम विभागातून हिशेबाची कागदपत्रे गायब; गैरव्यवहार लपविल्याचा संशय

Web Title: Investigation By City Traffic Police Begins Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashiktraffic Police
go to top