Nashik Drug Case: MD ड्रग्जसप्रकरणी आर्थिक व्यवहारांचीही चौकशी सुरू; ‘राजकीय’ नावांमुळे प्रकरणात चर्चांना उधाण

Drugs Crime
Drugs Crimeesakal

Nashik Drug Case : नाशिकरोड हद्दीतील शिंदेगावात एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्जस्‌चे दोन कारखाने पोलिसांनी उद्ध्वस्त केल्याने नाशिकचे नाव देशाच्या नकाशावर आले आहे. याप्रकरणात अद्याप पोलिसांच्या हाती संशयित लागलेले नाहीत. परंतु पोलिसांनी याप्रकरणाशी संबंधित आर्थिक व्यवहाराची चौकशी सुरू केली आहे.

त्यामध्ये संशयित कांबळे नामक व्यक्तीचे व्यवहार आढळून आला आहे. परंतु तो हाती लागल्यानंतर अनेक बाबींची उकल होणार आहे. दरम्यान, एमडी ड्रग्जसच्या प्रकरणात आता थेट पालकमंत्र्यांचेही नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

वडाळ्यातील कारवाईमुळे एका आमदाराने व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने ‘छोटी भाभी’ला सोडविण्यासाठी पोलिसांवर दबाव आणल्याची शहरभर चर्चा आहे. (Investigation into financial transactions in MD drugs case also underway Political names sparked debate in case nashik crime)

गेल्या आठवड्यात आधी मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी शिंदेगावातील एका कारखान्यावर धाड टाकून तब्बल ३०० कोटींचे एमडी ड्रग्जस्‌चा साठा जप्त केला.

तर त्यापाठोपाठ नाशिकरोड पोलिसांनी शिंदे गावातच दुसर्या कारखान्यावर धाड टाकून सुमारे सहा लाखांचा एमडी ड्रग्सचा साठा जप्त केला होता.

याच दरम्यान अंमलीपदार्थ विरोधी पथकाने वडाळागावात छापा टाकून दीड लाखांची एमडी पावडर जप्त करीत कथित छोट्या भाभीसह एकाला अटक केली होती.

अवघ्या दोन दिवसात पोलिसांनी एमडीविरोधात तीन कारवाया केल्याने नाशिकचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकले.

शिंदेगावातील कारवाईप्रकरणातील मुख्य संशयित अद्याप पसार आहेत. मुख्य सूत्रधार ललित पाटील पुण्यात फरार झाला. तर त्याचा भाऊ भूषण पाटीलही पसार झाला होता. परंतु पुण्याच्या गुन्हेशाखेने भूषण पानपाटील व त्याच्या साथीदारास उत्तरप्रदेशातून अटक केली आहे.

त्याच्या अटकेमुळे एमडी रॅकेटची उकल होण्यास मदत होणार आहे. तसेच शिंदेगावातील दोन्ही कारखान्याशी भूषणचा संबंध असण्याची दाट शक्यता नाशिक पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ऑनलाईन व्यवहार

शिंदेगावातील दोन्ही कारखाने संशयित कांबळे यानेच भाडेतत्त्वावर घेतल्याचे पोलिस तपासातून समोर आलेले आहे.

जागा मालक दत्तू जाधव यांना संशयित शिवा अंबादास शिंदे याने ऑनलाईन १० हजार रुपये तर संशयित संजय काळे याने खासगी बँकेचे ५ हजारांचे धनादेश भाड्यापोटी दिल्याचे तपासातून समोर आले आहे.

या गुन्ह्यांचा मुख्य सूत्रधार ललित व भूषण पानपाटील यांच्याशी संशयित कांबळे याचा संबंध असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

Drugs Crime
Nashik MD Drug Case : ड्रग्ज प्रकरणात सत्ताधारी भाजप आमदारांचाही सहभाग : नाना पटोले

भारत-नेपाळ सीमेवर अटक

एमडी ड्रग्जसचा मुख्य सूत्रधार भूषण पानपाटील, अभिषेक बलकवडे या दोघांना पुणे पोलिसांनी उत्तरप्रदेशातून अटक केली आहे.

पोलिसांच्या कारवाईमुळे पसार झालेले भूषण व अभिषेक हे दोघे नेपाळमध्ये शिरकाव करण्याच्या तयारीत असतानाच पुण्याच्या गुन्हेशाखेने त्यांना अटक केल्याचे सूत्रांकडून समजते.

भूषणच्या अटकेमुळे एमडीचे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. ललित व भूषण या दोघांचे पासपोर्ट पोलिसांनी जप्त केलेले आहेत.

राजकीय नावांमुळे चर्चा

शिवसेनेच्या (उबाठा) सुषमा आंधारे यांनी याप्रकरणी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. पालकमंत्री भुसे यांनी आरोप फेटाळून लावत मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.

तर, दुसरीकडे वडाळागावातील एमडी ड्रग्जसच्या कारवाईवेळीही जिल्ह्यातील एका आमदारासह शहरातील एका राजकीय पक्षाच्या गटाच्या पदाधिकार्याने पोलिसांवर ‘छोटी भाभी’ला सोडविण्यासाठी दबाव आणल्याचीही चर्चा शहरभर आहे.

एमडी ड्रग्जसमध्ये राजकीय वलय आल्याने नाशिककरांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

"एमडी ड्रग्जस्‌प्रकरणाती मुख्य संशयित भूषण पानपाटील, अभिषेक बलकवडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या संशयितांच्या चौकशीतून शिंदे गावासह शहरात इतरत्र ड्रग्जबाबतची माहिती समोर येऊ शकते. त्यानुसार नाशिक पोलीस कारवाई करतीलच. तसेच, तपासासाठी भूषण व त्याच्या साथीदाराचीही मागणी केली जाईल."

- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त, नाशिक.

Drugs Crime
Nashik MD Drug Case : जागा भाड्याने घेणारा ‘कांबळे’चा शोध; तपास गुन्हे शाखेकडे जाण्याची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com