Latest Marathi News | गुटखा विक्री अन् वाहतुकीत अल्पवयीन मुलांचा सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Minor  Criminals

Nashik Crime News : गुटखा विक्री अन् वाहतुकीत अल्पवयीन मुलांचा सहभाग

मालेगाव (जि. नाशिक) : नाशिक जिल्ह्यात ग्रामीण पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध जोरदार मोहिम सुरु केली आहे. पोलिसांच्या वाढत्या कारवाया पाहून आता अवैध गुटखा विक्री व वाहतुकीत विक्रेते अल्पवयीन मुलांचा अथवा कुटुंबातील सदस्यांचा सहभाग करुन घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. (Involvement of minors in selling and transporting Gutka nashik Latest Marathi News)

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

हेही वाचा: Nashik News : बोरी- आंबेदरी बंदिस्त जलवाहिनी समर्थनार्थ सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलन

शहरातील कुसुंबा रस्त्यावरील नायरा पेट्रोलपंपाच्या पाठीमागील उद्यानाजवळ आयशानगर पोलिसांनी छापा टाकून सुमारे ३० हजार ७७० रुपये किंमतीचा गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगणाऱ्या सरफराज शेख रियाज याला अटक केली. त्याच्या ताब्यातून गुटखा व तीन हजाराचा मोबाईल असा सुमारे ३३ हजार ७७० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

सरफराजसमवेत असलेल्या अल्पवयीन विधी संघर्षीत बालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघांविरुद्ध आयेशानगर पोलिस ठाण्यात प्रतिबंधीत केलेला गुटखा विक्री व बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक व्ही. एस. देवरे, उपनिरीक्षक पिराजी वाघमोडे, हवालदार दत्तात्रेय देवकर व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा: Police Recruitment : पोलीस भरती ऑनलाईन अर्जासाठी शेवटचे 2 दिवस; इथे करा क्लिक