Irrigation
sakal
इगतपुरी/नाशिक: राज्याचे जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (गोदावरी व कृष्णा खोरे) यांच्या सूचनेनुसार धरण व कालव्यांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम जलदगतीने सुरू झाली आहे. नाशिक जलसंपदा विभागाने जलसंपदा विभागाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी विशेष पथके तयार करण्याचे आदेश दिले असून, त्यानुसार कश्यपी धरणापासून कारवाईची सुरुवात करण्यात आली आहे.