Nashik News : इगतपुरीतील मुख्य रस्त्याचा प्रश्न थेट नागपूर विधान भवनात!

City President Sagar Handore along with BJP officials giving a statement to Public Works Minister Ravindra Chavan.
City President Sagar Handore along with BJP officials giving a statement to Public Works Minister Ravindra Chavan.esakal

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : शहराच्या मुख्य रस्त्याच्या प्रश्‍नाबाबत येथील भाजप शिष्टमंडळाने केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये जात भेट घेऊन तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्‍न मांडला. (issue of main road in Igatpuri directly in Nagpur Vidhan Bhavan Nashik News)

गेल्या आठवड्यात केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-नाशिक महामार्गाच्या कार्यक्रम निमित्त नुकतीच इगतपुरी येथे भेट दिली होती.यावेळी भाजपाच्या पदाधिकारी यांनी इगतपुरीतील अत्यंत महत्त्वाचा असलेला मुख्य रस्त्याचा प्रश्न केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मांडला होता. त्यावेळी गडकरी यांनी महाराष्ट्र सरकारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना फोन करून हा प्रश्न सोडविण्याबाबत सूचना केली होती.

तसेच भाजप पदाधिकाऱ्यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा असल्याने त्यांना भेटण्याचे निर्देश दिले. त्याप्रमाणे प्रदेश भाजप पदाधिकारी निवेदन दिले. रवींद्र चव्हाण यांनी गडकरी व माझे याबाबत बोलणे झालेले आहे असे सांगितले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित या रस्त्याच्या कामावरील स्थगिती उठविण्याचे आदेश दिले.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

City President Sagar Handore along with BJP officials giving a statement to Public Works Minister Ravindra Chavan.
Nashik News : एकेकाळचे दुर्लक्षित कुळीथ खातेय भाव! औषधी गुणधर्म असल्याने वाढली मागणी

या वेळी प्रदेश भाजप पदाधिकारी महेश श्रीश्रीमाळ, माजी आमदार पांडुरंग बाबा गांगड, जिल्हा पदाधिकारी पांडुरंग बऱ्हे, शहराध्यक्ष सागर हंडोरे, तालुका उपाध्यक्ष मुन्ना पवार आदी उपस्थित होते.

"भारतीय जनता पक्ष शहरातील समस्या राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडवण्यासाठी व शहर विकासासाठी कटिबद्ध आहे. इगतपुरी येथील मुख्य रस्त्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे."

- सागर हंडोरे, इगतपुरी शहराध्यक्ष, भाजप

City President Sagar Handore along with BJP officials giving a statement to Public Works Minister Ravindra Chavan.
Nashik News : टाकाऊ टायरपासून साकारला वाचनकट्टा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com