Nashik News : टाकाऊ टायरपासून साकारला वाचनकट्टा!

The students here made Vachankatta from waste tyres at Malinagar
The students here made Vachankatta from waste tyres at Malinagaresakal

सोयगाव (जि. नाशिक) : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांना वर्गाच्या पलिकडे वावरता यावं, हवं तिथं वाचता यावं, लिहता यावं, गप्पा मारता याव्यात या उद्देशाने माळीनगर दुंधे (ता. मालेगाव) येथील विद्यार्थ्यांनी टाकाऊ टायरपासून अभ्यासासाठी शाळेत वाचनकट्टा तयार केला आहे. त्यासाठी त्यांना प्रयोगशील शिक्षक भरत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. (Vakankatta made from waste tires by malinagar school students Nashik News)

शालेय विद्यार्थी उपयुक्त उपक्रमांसाठी माळीनगर शाळा नेहमीच विविध उपक्रम राबवत असते. निसर्गाच्या सानिध्यात अभ्यासाचं झाड उपक्रम त्यातून वाचन कट्ट्याची कल्पना आल्यावर विद्यार्थ्यांनी शिक्षक व पालकांना त्याविषयी कल्पना दिली.

पालकांनीही आपल्याकडे उपलब्ध असलेले ट्रॕक्टर, मोटरसायकल, चारचाकी गाड्यांचे टाकाऊ टायर थेट शाळेत आणून दिले. विद्यार्थी व शिक्षकांनी त्यांना रंगवून घेऊन सुंदर असा वाचन कट्टा तयार केला. त्याचा उपयोग विद्यार्थी करू लागले आहेत. मोटारसायकलींचे टायर रंगवून तेही शाळेच्या कंपाउंडला टांगून शाळेच्या भौतिक सुविधेत वाढ केलीय.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

The students here made Vachankatta from waste tyres at Malinagar
Nashik News: शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्याचा निर्धार! पशुसंवर्धन विभागातर्फे Online नोंदणीची मोहीम

शाळेच्या सौंदर्यातही यामुळे भर पडली आहे. नाविनता ही नेहमीच निरागस मनांना आनंद देते, जिज्ञासा वाढविते, समाजाला सुखावते या मानसशास्त्रीय सिद्धांताचा अवलंब या उपक्रमातून पूर्णत्वास आला. मुलांच्या कल्पकतेला वाव दिल्याने नवा प्रयोगशील टाकाऊपासून टिकाऊ वाचनकट्टा तयार झालाय. यासाठी विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी मेहनत घेतली आहे.

"माळीनगर शाळेतील विद्यार्थी व शिक्षक आमच्यासाठी काय नवोपक्रम घेऊन येणार याची आम्हाला नेहमीच उत्कंठा असते. त्यांचा आकर्षक बोलका वाचनकट्टा पाहून पालक म्हणून आम्ही सुखावत आहोत."-संजय रौंदळ, पालक

"माळीनगर शाळेचा नावलौकिक अशाच नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे वाढला असून, ‘कृतीतून शिक्षण’ या उक्तीची प्रचिती वाचनकट्टा पाहून पुन्हा एकदा आली. वाचन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे."

-ए. बी. वाघ, केंद्रप्रमुख, वडनेर

The students here made Vachankatta from waste tyres at Malinagar
Nashik News : एकेकाळचे दुर्लक्षित कुळीथ खातेय भाव! औषधी गुणधर्म असल्याने वाढली मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com