मालेगावात म्युकरमायकोसिसचे ५० संशयित; मनपा प्रशासन खडबडून जागे

mucormycosis
mucormycosismucormycosis
Summary

शहर व परिसरातील ५० संशयित रुग्णांपैकी दोघे नाशिक येथे उपचार घेत आहेत. डॉ. हिमांशू जैन यांनी आतापर्यंत बारा संशयित रुग्णांची तपासणी केली.

मालेगाव (नाशिक) : शहर व परिसरात म्युकरमायकोसिसचे (mucormycosis) ५० पेक्षा अधिक संशयित रुग्ण (Patient) असल्याचा अंदाज आहे. येथील सामान्य रुग्णालयात आतापर्यंत सात रुग्ण दाखल झाले. यातील शहरातील एक व ग्रामीण भागातील दोन असे तीन रुग्ण दगावले. तीन रुग्ण उपचार घेत असून, एका रुग्णाला घरी सोडण्यात आल्याचे सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. किशोर डांगे, डॉ. हितेश महाले यांनी ‘सकाळ’ला सांगितले. (It is estimated that there are more than 50 suspected cases of mucormycosis in malegaon)

शहर व परिसरातील ५० संशयित रुग्णांपैकी दोघे नाशिक येथे उपचार घेत आहेत. डॉ. हिमांशू जैन यांनी आतापर्यंत बारा संशयित रुग्णांची तपासणी केली. यातील तीन रुग्ण धुळे येथील होते. उर्वरित नऊ रुग्ण शहर व परिसरातील होते. रुग्णांची संख्या पाहता शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व मृत्यूची संख्या कमी असली तरी त्या तुलनेत म्युकरमायकोसिसचे आढळून येणारे रुग्ण गंभीर बाब असल्याचे नेत्ररोग, दंतरोग तज्ज्ञांनी सांगितले.

mucormycosis
उद्योग सुरू करण्यासाठी पालकमंत्री भुजबळांना साकडे

रुग्णांची संख्या वाढल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मनपाकडे सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सात रुग्णांचीच माहिती आहे. शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून उर्वरीत रुग्णांची माहिती घेण्याचे काम सुरु असल्याचे आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी सांगितले. कृषिमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी येथील शासकीय विश्रामगृहावर म्युकरमायकोसिस या आजाराची वाढती रुग्णसंख्या पाहून तातडीने आढावा बैठक घेत विविध उपाययोजना व जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

कोरोनाबाधित रुग्णांना या आजारातून बरे होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्टेरॉईड असलेल्या इंजेक्शनचा वापर करण्यात आला. मधुमेहाचा रुग्ण कोरोनाबाधित झाल्यास व त्यांना कोरोना संसर्गकाळात स्टेरॉईडचे अति इंजेक्शन दिल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. अशा रुग्णांना या आजाराची बाधा होवू शकते. डोळ्यात, नाकातून तोंडावाटे डोळ्यात तसेच मेंदूपर्यंत हा बुरशीजन्य आजार पोहचतो. यासाठी मधुमेहाचा अति त्रास असलेल्या रुग्णांनी मुख व नेत्र तपासणी करुन घ्यावी. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. हिमांशू जैन, दंतरोग तज्ज्ञ, मालेगाव

(It is estimated that there are more than 50 suspected cases of mucormycosis in malegaon)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com