नाशिक : आयटी, लॉजिस्टिक पार्कसाठी संस्थांची जमीन देण्याची तयारी

आयटी पार्कला प्रतिसाद
Multi-Modal Logistics Parks
Multi-Modal Logistics Parks sakal

नाशिक : जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रस्तावित सुरत- चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गाला लागून लॉजिस्टिक पार्क साकारण्यासाठी आडगाव- म्हसरूळ या नव्याने विकसित होत असलेल्या पट्ट्यात लॉजिस्टिक पार्क उभारण्याची तयारी महापालिकेने केली आहे. पहिल्या टप्प्यात मागविण्यात आलेल्या स्वारस्य अभिदेकाराला (एक्स्प्रेस ऑफ इंटरेस्ट) तीन तर आयटी पार्कसाठी पाच संस्थांनी प्रतिसाद दिल्याने भाजपच्या महत्वकांक्षी प्रकल्पाला बळ मिळाले आहे. पीपीपी तत्त्वावर मॉडेल विकसित करण्याचे महापालिकेचे प्रयत्न आहे.

Multi-Modal Logistics Parks
नागपूर : एसटी कर्मचारी कामावर परतण्याच्या मार्गावर

केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमधील विविध रस्ते प्रकल्पांचे उद्‌घाटन केले होते. या वेळी सुरत- चेन्नई ग्रीन फिल्डचा या भारतमाला प्रोजेक्ट मधील महामार्गाचा उल्लेख करताना नाशिक जिल्ह्यातून १२२ किलोमीटर प्रवास या महामार्गाचा होत असल्याने दिल्लीच्या धर्तीवर या महामार्गालगत लॉजिस्टिक पार्क उभारण्याचे आवाहन महापालिकेला केला होते. लॉजिस्टिक पार्कसाठी एक हजार कोटी रुपये देण्याची तयारीदेखील दर्शविली. तसेच, मागील आठवड्यात मुंबई येथेही राज्यात पाच ठिकाणी लॉजिस्टिक पार्कची घोषणा श्री. गडकरी यांनी केली. त्यात नाशिकचा समावेश करण्यात आला. शहर विकासाच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची ठरणार असल्याने सत्ताधारी भाजपने महासभेत लॉजिस्टिक पार्कचा प्रस्ताव मंजूर केला. लॉजिस्टिक पार्क आडगाव- म्हसरूळ भागात साकारले जाणार आहे. त्यासाठी स्वारस्य देकार मागविण्यात आले. त्यात मते असोसिएटस, विजयगीत मार्केटिंग, तसेच गजरात एंटरप्राइजेस या कंपन्यांनी जागा देण्यात स्वारस्य दाखविले.

Multi-Modal Logistics Parks
औरंगाबाद : मंगळसूत्र चोऱ्यांमध्ये बाप-लेकाचा धुमाकूळ!

आयटी पार्कला प्रतिसाद

आडगाव शिवारातील सर्वे क्रमांक ११०३ पैकीमधील दहा एकर जागेसह सर्व्हे क्रमांक ११०३, ११०१, ११०४, ११०५, ११०६, ११०९, १११०, ११११, १११२ व म्हसरूळ शिवारातील सर्वे क्रमांक ९३ ते ९५, ९७, ९८ व १०३ या ना विकास क्षेत्रात आयटी पार्कचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. आयटी पार्कसाठी चालू अंदाजपत्रकात दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. आयटी पार्कच्या जागेत तीस मीटरचे रस्ते विकसित करणे, मार्केट, शॉपिंग सेंटर, पाण्याची सुविधा, बस टर्मिनल आदी प्रकारच्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत. पार्क विकसित करण्यासाठी महापालिकेच्या पॅनलवरील वास्तुविशारदांची नियुक्ती करण्यात आली. आयटी कंपन्यांचा नाशिकमध्ये विस्तारासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनी स्थापन केली जाणार आहे.केंद्र सरकारच्या माध्यमातून कॉमन फॅसिलिटी सेंटर व टेक्नॉलॉजी सेंटरसाठी निधी मंजूर केला जाणार आहे. दरम्यान, आयटी पार्कसाठी मागविण्यात आलेल्या स्वारस्य देकारात मते असोसिएटस, गजराज एंटरप्राइजेस, साधना पटेल, अनिल त्रिभुवनलाल काल्या, पियुष सिसोदिया यांनी जमीन देण्यास स्वारस्य दाखविले.

Multi-Modal Logistics Parks
नांदेड ते भूज गुजरातपर्यंत एक्स्प्रेस सुरू करावी

"आयटी कंपन्या नाशिकमध्ये येण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न आहे. महासभेत प्रस्ताव मंजूर केल्यानंतर आता स्वारस्य देकाराच्या माध्यमातून जागा देण्यास स्थानिक जमीन मालक तयार असल्याने ही एक सकारात्मक बाब आहे."

-सतीश कुलकर्णी, महापौर

"शहरातून प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांसाठी ट्रक टर्मिनल्स, कुलिंग प्लॅन्ट, वर्कशॉप, मॉल, ट्रान्स्पोर्ट, गोडाऊन, शेतमाल विक्रीसाठी बाजार समित्या आदींची व्यवस्था होणार असल्याने प्रदूषण कमी होण्याबरोबरच रोजगार उपलब्ध होईल."

- गणेश गिते, सभापती, स्थायी समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com