Nashik Crime : ‘त्या’ हल्लेखोराला सापळा रचून अटक | latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

attack cctv footage

Nashik Crime : ‘त्या’ हल्लेखोराला सापळा रचून अटक

इंदिरानगर (जि. नाशिक) : पाथर्डी गावाजवळ असलेल्या जाधव पेट्रोलपंपावर झुबेदा युसूफ खान (वय ३६) या महिलेवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करणाऱ्या प्रमोद प्रकाश गोसावी याच्या इंदिरानगर पोलिसांनी २४ तासाच्या आत सापळा रचून जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळ मुसक्या आवळल्या. (Jadhav petrolpump woman attacker arrested after police laying trap Nashik Crime latest marathi news)

हेही वाचा: Crime Update : अत्याचार प्रकरणी संशयितास जालन्यातून अटक

विशेष म्हणजे याच ठिकाणी झुबेदा यांच्यावर उपचार सुरू आहेत. गुरुवारी (ता. २५) दुपारी दीडच्या सुमारास गोसावी याने झुबेदा यांच्यावर कोयत्याने हल्ला करून त्यांना जखमी केले होते. गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे त्या त्याच्याशी पुन्हा संबंध ठेवण्यास नकार देत असल्याने त्याने हे कृत्य केले.

गुन्हा झाल्यानंतर उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल खान आणि वरिष्ठ निरीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निखिल बोंडे, सहाय्यक उपनिरीक्षक एल. ए. बोराडे, सागर परदेशी, जावेद खान, सौरभ माळी, ढगे आदींना तो राहत असलेल्या घोटी, इगतपुरी, सिन्नर आदी भागात शोधण्यासाठी पथक रवाना केले होते.

दरम्यान, वरिष्ठ निरीक्षक बांबळे यांना गोपनीय सूत्रांकडून गोसावी हा झुबेदा यांच्यावर उपचार सुरू असलेल्या शासकीय रुग्णालय परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून उपरोक्त टीमसह मन्सूर शेख, पगारे आदींसह कर्मचाऱ्यांनी सापळा रचून तो आल्यानंतर त्याला ताब्यात घेतले.

हेही वाचा: Crime : सातपूरला इनोव्हातून अवैध मद्यसाठा जप्त

Web Title: Jadhav Petrolpump Woman Attacker Arrested After Police Laying Trap Nashik Crime Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..