

Historical Significance of Dev Deepavali at Jagdamba Temple
Sakal
वणी (नाशिक) : सप्तशृंगी मातेचे मुळरुप समजले जाणाऱ्या वणी गावातील जगदंबा माता मंदीरात किन्नरपंथीय समुहाचे प्रमुख स्वर्गीय भास्कर गुरु यांची देव दिपावली निमित्त दीपोत्सवाची परंपरा शिष्यगणांकडून कायम राखली जात, आज ता. २१ देव दीपावली निमित्त शेकडो दिवे प्रज्वलीत करुन व फटाक्यांची आतीषबाजी करीत देव दीपावली उत्सव साजरा केला. गोरेगांव मुंबई येथील किन्नर गट समुहाचे प्रमुख स्व. भास्कर गुरु हे गेल्या ३२ वर्षांपासून सप्तशृंगी गड व वणी येथील जगदंबा माता मंदिरात देव दीपावली उत्सव साजरा करीत.