ZP Nashik
ZP Nashikesakal

Nashik ZP News : जलजीवन कामप्रश्‍नी सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यावर अन्याय

नाशिक : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विभागाकडून १५०० हून अधिक कामांचे वाटप झाले. मात्र, शासन आदेशाप्रमाणे यातील ३३ टक्के कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना देणे बंधनकारक असताना त्यांचे वाटप झालेले नसल्याची तक्रार महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनच्या नाशिक शाखेने केली आहे. यात सुशिक्षित बेरोजगारांवर मोठा अन्याय झाला आहे. या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. (Jal jeevan Work Question Injustice to Educated Unemployed Engineer Nashik zp Latest Marathi News)

ZP Nashik
Dhule Plastic Ban : 4 टन ‘रिसायकलिंग’ला; साडेतीन टन पुन्हा जमा

संघटनेने मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना निवेदन दिले आहे. ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या आदेशानुसार सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना ३३ टक्के कामे देणे बंधनकारक आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने एक हजार कोटींचे वाटप केलेल्या कामांपैकी ३३० कोटींची कामे सुशिक्षित बेरोजगारांना मिळणे आवश्यक होती.

मात्र केवळ ६३ कोटींची कामे प्राप्त झालेली आहेत. याशिवाय या कामांचे वाटप करताना शासन नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे. या अभियंत्यांना तीन कोटींपर्यंतचे किंवा ठेकेदार नोंदणी केल्यानंतर तीन वर्षे यापैकी लवकर असेल त्या कामासाठी प्रत्यक्ष काम केल्याच्या अनुभवाच्या दाखल्याची निविदाप्रक्रियेत आवश्यकता नसल्याबाबत व आवश्यक यंत्रसामग्रीबाबत कालावधीत शिथिलता देण्यात आलेली आहे.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

ZP Nashik
Nashik Crime News : 330 क्विंटल साखरेची परस्पर विक्री; फसवणुकीचा गुन्हा दाखल

त्यानुसार सुशिक्षित बेरोजगारांना कामे देणे अनिवार्य होते. मात्र २० जुलै २०२१ ते ३० ऑक्टोबर २०२२ पर्यंतच्या ७५० कोटींच्या निविदाप्रक्रियेत या अभियंत्यांना सहभागी करून घेतलेले नाही. दोन-दोन महिने निविदा उघडण्यात आलेल्या नाहीत. यात चार हजार ते साडेचार हजार अभियंत्यांवर अन्याय झालेला आहे. यामुळे जलजीवनअंतर्गत प्रसिद्ध झालेल्या सर्व निविदा रद्द कराव्यात, त्या पुन्हा नव्याने प्रसिद्ध करण्यात याव्यात, ३३ टक्के कामे ही सुबे अभियंत्यांना द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल. त्यानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा संघटनेने निवेदनात दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष निसर्गराज सोनवणे, सरचिटणीस विनायक माळेकर, कार्याध्यक्ष मिलिंद सैंदाणे, मुख्यसंघटक अनिल आव्हाड, उपाध्यक्ष चंद्रशेखर डांगे, संजय पवार, सचिव अजित सकाळे, सागर विंचू, संजय करनोर उपस्थित होते.

ZP Nashik
Nashik News : नाशिकचा विभव ठरला पोडियम पूर्ण करणारा पहिला सायकलिस्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com