या मातब्बरांची माघारी

या मातब्बरांची माघारी
Published on: 
पालकमंत्री पुत्र, माजी सभापती, माजी महापौरांची माघार ------- जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जामनेर, धरणगाव, जळगावचा तिढा सुटला सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १७ : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. १७) उमेदवार बिनविरोध होण्यासाठी अनेक मातब्बरांनी माघार घेतली. माघार घेणाऱ्यांमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील, माजी महापौर जयश्री महाजन, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रभाकर सोनवणे, ग.स. सोसायटीचे संचालक उदय पाटील, भाजपचे सतीश शिंदे (पाचोरा), जळगावचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, जळगावच्या नगरसेविका वैशाली अमित पाटील (महिला ओबीसी गटातून माघार) यांचा सामावेश आहे. धरणगाव विकास सोसायटी मतदारसंघातून जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन संजय पवार यांच्या पत्नी सोनल पवार यांचा अर्ज होता. त्यांच्याविरूद्ध पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील, भाजपच्या गायत्री भगवान यांनी अर्ज भरला होता. पालकमंत्री पाटील यांना विधानसभा निवडणुकीत मोलाची मदत करणाऱ्या संजय पवारांविरोधात उमेदवार दिल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली होती. प्रताप पाटील माघार घेणार नाहीत व ही लढत लक्षवेधी होईल, असे वाटत होते. मात्र, मंगळवारी प्रताप पाटील यांनी शिवसेनेचा आदेश व जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात अर्ज मागे घेतल्याने सोनल पवार बिनविरोध झाल्या. ------- दोन मंत्री बिनविरोध जलसंपदामंत्री महाजन यांच्याविरोधात त्यांचेच कार्यकर्ते तुकाराम निकम यांनी अर्ज भरला होता. मात्र, मंत्री महाजन हेच आपले नेते आहेत. तेच संचालकपदावर पाहिजेत, असे वाटल्याने निकम यांनी अर्ज मागे घेतल्याने मंत्री महाजन बिनविरोध झाले. अरविंद देशमुख यांनीही अर्ज मागे घेतला. जळगाव विकास सोसायटी मतदारसघातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात माजी महापौर जयश्री महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रभाकर सोनवणे यांचे अर्ज होते. श्री. पाटील यांनी सोमवारी (ता. १६) व महाजन, श्री. सोनवणे यांनी मंगळवारी अर्ज मागे घेतल्याने पालकमंत्री बिनविरोध झाले. आमदारपुत्र बिनविरोध पाचोऱ्याचे आमदार किशााेर पाटील यांचे पुत्र सुमीत पाटील यांचा अर्ज छाननीत अवैध ठरला होता. नंतर तो अर्ज नाशिक सहनिबंधकांनी अपिलात वैध ठरला. मंगळवारी सुमीत पाटील यांच्याविरोधात भाजपचे सतीश शिंदे यांनी अर्ज मागे घेतल्याने सुमीत पाटील बिनविरोध झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.