जळगाव: सध्या जिल्ह्यातील विजेची मागणी एक हजार ७४ मेगावॉट आहे. उन्हाळ्यात ही मागणी एक हजार ४०८ मेगावॉटपर्यंत वाढते. नियोजित सुधारणा आणि नवीन प्रकल्पांमुळे ६८२ मेगावॉट अतिरिक्त क्षमता निर्माण होईल. याशिवाय तीन हजार ९०० एकर जमीन सौर प्रकल्पांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे जळगाव महाराष्ट्राच्या ऊर्जाधारी जिल्ह्यांपैकी एक ठरणार आहे, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.