टुडे एक ॲंकर
NSK26H33934
जळगाव : ‘फायर बुलेट’च्या लोकार्पणप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, खासदार स्मिता वाघ, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त आदित्य जीवने आदी.
शीर्षक
अग्निशमन दलात सहा फायर दुचाकींची भर
---
पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण; आपत्कालीन स्थितीत मिळणार मदत
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २९ : महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात आणखी नवीन वाहनांची भर पडली असून, टी.बी. हॉस्पिटल परिसरात पालकमंत्र्यांच्या हस्ते आज (ता. २९) सहा ‘फायर बुलेट’चे लोकार्पण करण्यात आले. या सुविधेमुळे शहरातील आग लागण्याच्या घटनांमध्ये तातडीने घटनास्थळी पोहोचून अग्निशमन कार्यवाही करण्यास मदत होणार आहे.
शहरातील अग्निसुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने जळगाव महापालिकेच्या वतीने डी-मार्टसमोरील शिवाजी उद्यान,शहरातील अरुंद रस्ते, गर्दीची ठिकाणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देण्यासाठी अशा प्रकारची सुविधा उपयुक्त ठरू शकते. या लोकार्पणामुळे महापालिकेच्या अग्निशमन सेवेला अधिक सक्षम करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळणार आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, खासदार स्मिता वाघ, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त आदित्य जीवने, मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे, केंद्र अधिकारी भारत बारी यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी गिरीश खडके, देवीदास सुरवाडे, प्रकाश चव्हाण, अजय पाटील, अक्षय नाईक, वृषभ सुरवाडे, नितीन राठोड, शेख, सौरभ चिकटे, योगेश पाटील, सत्तार तडवी, केतन पाटील, रितेश उबाळे, सुमित साबळे, विनोद कोडपे आदी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी अग्निशमन दल तसेच संबंधित मान्यवर उपस्थित होते.