जळगावात ३७३ पाकिस्तानी वास्तव्यास

जळगावात ३७३ पाकिस्तानी वास्तव्यास
Published on: 
जळगावात ३७३ पाकिस्तानी वास्तव्यास उपशीर्षक ‘सीएए’अंतर्गत शंभर जणांनी मिळविले कायम नागरिकत्व सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ८ : जिल्ह्यात ३७३ पाकिस्तानी नागरिक वास्तव्याला आहेत. गेल्या काळात दीर्घकालीन वास्तव्यासाठी आल्यानंतर १०० पाकिस्तानी नागरिकांना ‘सीएए’ अंतर्गत भारतीय नागरिकत्व बहाल केले आहे, तर दीर्घकलीन ‘व्हिसा’वर आलेल्या अन्य नागरिकांना वास्तव्यासाठी मुदतवाढीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून राज्याच्या गृह विभागाकडे सादर केला आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या अल्पसंख्याक समुदायातील (हिंदू, शीख, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि बौद्ध) नागरिकांना, तसेच भारतीय नागरिकांशी विवाह झालेल्या महिलांना दीर्घकालीन व्हिसा दिला जातो. नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अल्पसंख्याक नागरिकांना भारताचे पूर्ण नागरिकत्व दिले जात असून, जिल्ह्यात आतापर्यंत १०० नागरिकांना हे नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे. जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या दोन पाकिस्तानी मुस्लिम महिलांच्या दीर्घकालीन व्हिसाची मुदत २०२७ पर्यंत वैध आहे. यात फरझाना अली मोहंमद (आगमन : २२ मार्च १९८५, व्हिसा मुदत : २६ जुलै २०२७) आणि फरिदा मुर्तजा (आगमन : २८ जुलै २०१२, व्हिसा मुदत : २७ जुलै २०२७) यांचा समावेश आहे. जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या उर्वरित नागरिकांच्या व्हिसा मुदतवाढीच्या प्रस्तावावर राज्य गृह विभागाकडून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. --- जिल्ह्यात वास्तव्यास असलेले पाकिस्तानी (२८ सप्टेंबर २०२६ पर्यंत) दीर्घकालीन व्हिसा मंजूर झालेले : २९२ दीर्घकालीन व्हिसा मुदतवाढीचे प्रलंबित अर्ज : ८१ ‘सीएए’अंतर्गत नागरिकत्व प्राप्त : १०० एकूण पाकिस्तानी नागरिक : ३७३ २०२७ पर्यंत व्हिसाची मुदत असलेल्या महिला : २ --- कोट भारतात आश्रयाला आलेल्या नागरिकांना सीएए कायद्यांतर्गत सर्व स्तरावर पडताळणीनंतरच गृह विभागातर्फे नागरिकत्व मिळाले आहे. परदेशी नागरिकांचे आगमन, व्हिसा आणि त्यांच्या वास्तव्याबाबत पोलिस दल काळजीपूर्वक पाठपुरावा करून लक्ष ठेवत आहे. -श्रीकांत धिवरे, पोलिस अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com