बंद सिग्नलचा महापालिका घेणार शोध

बंद सिग्नलचा महापालिका घेणार शोध
Published on: 
टुडे सेकंड मेन (सिग्नलचा व महापालिकेचा फोटो वापरावा) बंद सिग्नलचा महापालिका घेणार शोध सर्व १५ सिग्नलचे करणार सर्वेक्षण; प्रगत तंत्रज्ञ असलेल्या यंत्रणेची गरज सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ७ : शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या ट्रॅफिक सिग्नलपैकी तब्बल १० सिग्नल बंद असल्याचे समोर आल्यानंतर महापालिका प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. आता शहरातील सर्व १५ ट्रॅफिक सिग्नलची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचे सविस्तर सर्वेक्षण केले जाणार आहे. कोणता सिग्नल नेमका कशामुळे बंद आहे, कोणत्या उपकरणात बिघाड आहे तसेच दुरुस्तीसाठी किती खर्च अपेक्षित आहे, याची माहिती सर्वेक्षणातून संकलित केली जाणार आहे. महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांनी याबाबत माहिती देताना, सर्व सिग्नलची सद्यस्थिती तपासून आवश्यकतेनुसार दुरुस्तीची कामे हाती घेतली जातील, असे सांगितले. केवळ सिग्नल सुरू करण्यापुरतीच कार्यवाही न करता शहरातील वाहतूक व्यवस्थेत आणखी कोणत्या सुधारणा करता येतील, याचाही आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रमुख चौकांमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नवीन उपाययोजना राबविण्याची शक्यता आहे. प्रगत यंत्रणा हवी स्मार्ट सीटी तसेच प्रगत शहरांमधील रस्त्यांवरील वाहतूक नियंत्रणासाठी अत्याधुनिक सिग्नल यंत्रणांचा वापर केला जात आहे. त्याच प्रमाणे शहरातील वाढलेली वाहतूक पाहता शहरातील मुख्य चौकांमध्ये प्रगत तंत्रज्ञ असलेली सिग्नल यंत्रणा बसविण्याची गरज आहे. चौकट श्वेतपत्रिकेतील मुद्रणात चूक दरम्यान, प्रशासकीय राजवटीतील कामांच्या खर्चाबाबत मागविण्यात आलेल्या माहितीत आकाशवाणी चौकातील सिग्नलच्या रकमेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. नगरसेविका वैशाली पाटील यांनी मागविलेल्या माहितीत संगणकीय मुद्रणातील चुकीमुळे या सिग्नलच्या कामाची रक्कम तब्बल एक कोटी रुपये असल्याचे नमूद झाले होते. मात्र, महापालिका प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण देत आकाशवाणी चौकातील सिग्नल उभारणीसाठी प्रत्यक्षात १३ लाख रुपये खर्च झाल्याचे स्पष्ट केले आहे. माहिती देताना झालेल्या टंकलेखनाच्या चुकीमुळे एक कोटी रुपयांचा आकडा छापला गेल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे सिग्नलच्या खर्चाबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com