अतिरीक्त विज भारामुळे सिंधीकॉलनीत घर पेटले

अतिरीक्त विज भारामुळे सिंधीकॉलनीत घर पेटले
Published on: 
NSK26H34714 जळगाव : स्वयंपाक घराची झालेली दुरवस्था. --- अतिरिक्त वीजभारामुळे घर पेटले सिंधी कॉलनीतील घटना; फ्रिजच्या कॉप्रेसरचा स्फोट होऊन आग सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ७ : शहरातील सिंधी कॉलनी येथे अतिरिक्त वीजभारामुळे फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट घडल्याने घराला आग लागली. शनिवारी (ता.७) घडलेल्या या घटनेत घरातील संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. शहरातील सिंधी कॉलनी परिसरात राजेश सिंधी कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. शनिवारी (ता.७) पहाटे एकच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरात अचानक फ्रिजच्या कॉप्रेसरचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. आग लागली त्यावेळेस वयोवृद्ध दाम्पत्य घरातच होते. घटनेची माहिती मिळाल्यावर परिसरातील तरुणांसह सुरेश पंजाबी यांनी मदतीला धाव घेतली. घराचे दार तोडून वयोवृद्ध दाम्पत्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने त्यांचा जीव वाचला असून, घरातील सर्व साहित्य विद्युत जोडणीची वायरिंग जळून खाक झाली आहे. चौकट वीजविभागाची निष्काळजी जळगाव शहरात अनेक रहिवासी वस्त्यांमध्ये वीजभाराचे नियमन करण्यात वीजमंडळ अपयशी ठरले असून, कमी-जास्त अनियमित पद्धतीने विजेचा पुरवठा होतो. अतिरिक्त भाराचा पुरवठा झाल्यामुळेच आमच्या घरातील रेफ्रिजेरेटरच्या क्रॉप्रेसरचा स्फोट घडल्याने घर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून नुकसान झाले असून याची सर्वस्वी जबाबदारी वीजमंडळाची असून, आम्हाला त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी या वृद्ध दाम्पत्याकडून करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.