ZP School
sakal
वणी: जिल्हा परिषद शाळांचा विकास व्हावा आणि आधुनिक शिक्षणप्रणालीची अंमलबजावणी व्हावी यासाठी शिक्षणमंत्री दादा भुसे विशेष प्रयत्नशील आहेत. मात्र, त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यातील जानोरी (ता. दिंडोरी) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक बदली धोरणाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार टाकत आंदोलनाचा मार्ग अवलंबल्याने प्रशासनासमोर गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.