sakal
नाशिक: ‘शासकीय काम अन् सहा महिने थांब’ असे आपल्याकडे उपरोधिकपणे म्हटले जाते. पण आपल्या मोबाईलमधील व्हॉट्सॲपवर मेसेज केल्याबरोबर परवानगी किंवा दाखला मिळेल, असे कुणी म्हटले तर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल. जिल्हा परिषदेने यादृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून, ग्रामस्थांना २२ सेवांचा लाभ आता घरबसल्या मिळणार आहे.