नाशिक: मराठवाड्याची तहान भागविणारे जायकवाडी धरण ९२ टक्के भरले. जुलैअखेरीस धरणाच्या १८ दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने मराठवाड्यातील जनतेत समाधान आहे. सलग चौथ्या वर्षी धरणात समाधानकारक साठा निर्माण झाल्याने समन्यायी पाणी वाटपावरून निर्माण होणार नाशिक व अहिल्यानगर विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष टळेल.