नाशिक- विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने अंधाधुंद मते वाढली, त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सीसीटीव्ही का लावले हे निवडणूक आयोग बघत नाही अन् दुसऱ्यांनाही दाखवत नाही, अशी कुठे लोकशाही असते का, असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणुकीतील निकालावर बोट ठेवले.