जेडीसीसी बँक खाते प्रकरणात२८पर्यंत कोठडी

जेडीसीसी बँक खाते प्रकरणात२८पर्यंत कोठडी
Published on: 
‘जेडीसीसी’ खाते प्रकरणात विजय पाटलांना कोठडी मविप्र फसवणूक प्रकरण : दुसऱ्या गुन्ह्यातून हस्तांतर सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २४ : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेच्या नावे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कथित अनधिकृतपणे खाते कार्यान्वित करून आर्थिक व्यवहार केल्याच्या प्रकरणात संशयित विजय भास्कर पाटील यांना शनिवारी (ता.२४) न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या बनावट शिक्के व ठराव प्रकरणात यापूर्वीच अटकेत असलेले विजय भास्कर पाटील यांचा जामीनअर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. परिणामी, त्यांचा जेल मुक्काम वाढला असतानाच जेडीसीसी बँक खाते प्रकरणात ५ ऑक्टोबरला पुन्हा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात जिल्‍हापेठ पोलिसांनी त्यांना कारागृहातून पुन्हा ताब्यात घेत शनिवारी जिल्‍हा व सत्र न्यायालयात हजर केले. संस्थेच्या अधिकृत संचालक मंडळाचा ठराव अथवा आवश्यक अधिकारपत्र नसताना संशयित विजय भास्कर पाटील व त्यांच्या साथीदारांनी स्वतःला संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष दर्शवून बँक खाते कार्यान्वित केल्याचा संशय आहे. बँकेकडून प्राप्त माहितीत खाते सुरू करण्यासाठी आवश्यक अधिकृत ठराव, अधिकारपत्रे व इतर महत्त्वाच्या कागदपत्रांच्या उपलब्धतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. बँक खाते कार्यान्वित करण्यामागील प्रक्रिया, संबंधितांची भूमिका आणि आर्थिक व्यवहारांबाबत तपासातून नेमके काय समोर येते याचा तपास बाकी असल्याने पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती. ----- बँक अधिकारी गोत्यात? या प्रकरणात बँकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या भूमिकेची, खाते कार्यान्वित करण्यासाठी वापरलेल्या कागदपत्रांची तसेच खात्यातून झालेल्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात येत असल्याने आता बँकेचे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही चौकशीची वेळ येऊन ठेपली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com