सावळघाटातील थरार! जीप 100 फुटापर्यंत दरीत गेली घसरत..

accident
accidentesakal

पेठ (जि.नाशिक) : नाशिक-बलसाड (nashik-balsad) रस्त्यावरील सावळघाट व कोंटबीघाट पावसामुळे वाहन चालकांसाठी जिवावर बेतणारा ठरत आहे. सिमेंटचा रस्ता आणि पावसामुळे झालेला चिखल यामुळे वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच घटना घडत नाशिकहून गुजरातकडे (nashik) चाललेला कंटेनर रस्त्यात आडवा होऊन जीपला धडक दिली. यात जीप शंभर फूट खेल दरीच्या बाजूने घसरत गेली. सावळघाटात हा थरार पाहायला मिळाला.

सावळघाटातील थरार! जीप 100 फुटापर्यंत दरीत गेली घसरत..

सावळघाटातील मध्यावर आज (ता.२२) दुपारी हा अपघात घडला. घाटातील एका वळणावर पीकअप (MH 14 H G 9606) ला नाशिककडून गुजरातकडे जाणाऱ्या कंटेनरने (GJ 06 AX 9870) धडक दिल्याने पीकअप जवळपास शंभर फूट दरीच्या दिशेने घसरत गेली. कंटेनर रस्त्यात आडवा झाल्याने काही काळ घाटातील वाहतूक विस्कळीत झाली. पावसामुळे सिमेंटच्या वळण रस्त्यावर चिखल वाहून येत असल्याने रस्ता निसरडा झाला आहे. वाहनांचे ब्रेक लागल्यानंतर देखील वाहने जागेवर थांबत नसल्याने अपघात वाढले आहेत. दरम्यान अपघाताचे वृत्त समजताच दिंडोरीचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलिस नाईक पजई, शिलावटे, पोलिस शिपाई खांडवी आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन क्रेनच्या साह्याने वाहने बाजूला करून घाटातील वाहतूक सुरळीत केली.

accident
मनसेत पदोन्नती की पदावनती? शाखाध्यक्ष मेळाव्यातील यादी
accident
इम्पेरिकल डेटा राज्याला देण्यास केंद्राचा नकार, सुप्रीम कोर्टात सुनावणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com