

Onion Crisis Peaks in Satana: Farmer Attempts Suicide Over Mockery of Prices
Sakal
सटाणा : अवकाळी पाऊस, गारपीट, वाढते उत्पादन खर्च आणि त्यातच कांद्याच्या बाजारभावातील ऐतिहासिक घसरण यामुळे आधीच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांचा संताप येथील सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत उद्रेकाच्या टोकाला पोहोचला. बाजार समितीत कांद्याला अवघा ५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांदा भरलेला ट्रॅक्टर थेट बाजार समिती कार्यालयासमोर उभा करून तीव्र आंदोलन छेडले. परिस्थिती एवढी चिघळली की, ज्यांच्या कांद्याला हा मातीमोल दर मिळाला त्या शेतकऱ्यानेच भर बाजारात गळ्यात दोरखंड बांधून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.