धुळे टुडे २ साठी
32517
धुळे : जेएनयूतील विद्यार्थीनींच्या लैंगिक छळप्रकरणी संशयित काँग्रेस खासदारावर कारवाई करावी या मागणीसाठी महाराणा प्रताप चौकात निदर्शने करतांना भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या.
---
जेएनयूतील लैंगिक छळप्रकरणी
भाजप महिला मोर्चाचे आंदोलन
---
खासदार प्रा. अकोइजामा यांच्यावर कारवाईची मागणी
---
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १६ : नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील ११ विद्यार्थिनींच्या कथित लैंगिक छळप्रकरणी संशयित काँग्रेसचे खासदार प्रा. अंगोमचा बिमोल अकोइजाम यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी भाजप महिला मोर्चातर्फे धुळ्यातील महाराणा प्रताप चौकात आंदोलन करण्यात आले.
भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा धरती देवरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात खासदारांचा राजीनामा घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली. संबंधित खासदारांना पाठीशी न घालता त्यांच्यावर कारवाई करावी, पीडित विद्यार्थिनींना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. या विषयावर काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी यांच्या भूमिकेवरही भाजप आंदोलनकर्त्यांनी टिका केली.
आंदोलनात श्रीमती देवरे, माजी महापौर जयश्री आहिरराव, प्रतिभा चौधरी, नगरसेविका कल्याणी अंपळकर, भाजप शहराध्यक्षा सुवर्णा पाटील, नगरसेविका कविता सोनवणे, मोहिनी धात्रक, शीला भडांगे, देवयानी जगताप, देवयानी बडगुजर, हर्षदा पाटील, योगिता खलाणे, प्रतिभा देवरे, मधुमती देवरे, स्वाती बोरसे, मीनाक्षी मोरे, वैशाली अहिराव, संगीता सूर्यवंशी, जिजाबाई पाटील, अनिता पाटील, सोनाली आहिरे, प्रतिभा पाटील, कविता पाटील, वैशाली सोनवणे, प्रिया सूर्यवंशी यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा या आंदोलनात सहभाग होता.