नाशिक- गेल्याच आठवड्यात सव्वा कोटींचा गंडा घातल्याने प्रवीण सोनवणे यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या संशयित सचिन बबनराव चिखले (रा. नाशिक रोड) याच्याविरोधात ९७ लाख ५० हजारांची फसवणूक केल्याचा दुसरा गुन्हा अंबड पोलिसांत दाखल झाला. संशयित सचिन हा सीएसटी विभागात नोकरीला असून, सध्या तो फरारी झाला. अंबड पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके त्याचा कसून शोध घेत आहेत.