Crime News : पैसे दिल्याशिवाय माझा अंत्यविधी करू नका; नाशिकमध्ये सुसाइड नोटमधून गंभीर आरोप

Job Scam Pushes Man to Suicide in Nashik : करी लावून देण्याचे आमिष दाखवून सव्वा कोटी रुपये उकळले. एकाकडून फसवणूक झाल्याने तणावात गेलेल्या प्रवीण बापू सोनवणे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
suicide note
suicide notesakal
Updated on

नाशिक- नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सव्वा कोटी रुपये उकळले. त्यामुळे एकाकडून फसवणूक झाल्याने तणावात गेलेल्या प्रवीण बापू सोनवणे (वय ४९, रा. कंधाणे, ता. बागलाण) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिक शहरातील सिडको परिसरात नातलगाच्या घरी त्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत संशयित सचिन बबनराव चिखले (रा. नाशिक रोड) याच्या नावाचा व सव्वा कोटी रुपयांचा स्पष्ट उल्लेख आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com