const e=e=>{const o=window.location.origin;navigator.sendBeacon(`${o}/scooby/api/v1/log/event`,JSON.stringify(e))};e({page_url:window.location.href,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),(()=>{const o=window.history.pushState;window.history.pushState=new Proxy(o,{apply:(o,r,n)=>{const t=window.location.href,i=o.apply(r,n),a=window.location.href;return t!==a&&e({page_url:a,referrer:document.referrer,event_type:"page_view"}),i}})})();

Nashik News: ‘गोसावीं’च्या अहवालास अधिवेशनाचा अडसर; पुढील आठवड्यात कारवाईची शक्यता

जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका शाखेचे सहआयुक्त श्याम गोसावी यांच्या चौकशी अहवालास विधिमंडळाच्या अधिवेशनामुळे विलंब झाला आहे.
inquiry report file Photo
inquiry report file Photoesakal

Nashik News: जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका शाखेचे सहआयुक्त श्याम गोसावी यांच्या चौकशी अहवालास विधिमंडळाच्या अधिवेशनामुळे विलंब झाला आहे. (Joint Commissioner Shyam Gosavi inquiry report is likely to be acted upon next week nashik news)

चौकशी समितीप्रमुख तथा अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे हे नागपूरहून आल्यावर अहवाल जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे सुपूर्द केला जाईल. दरम्यान, शुक्रवारी (ता. २२) जिल्हाधिकारीच रजेवर असल्याने अहवालावर पुढील आठवड्यातच कार्यवाही होण्याची शक्यता आहे.

लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नगरपालिका शाखेच्या दप्तराची गेल्या सप्ताहापासून तपासणी केली जात आहे. तपासणीवेळी ई-टपाल, वेतन व संवर्ग समावेशन, रजा, विभागीय चौकशा व न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित असल्याचे उजेडात आले. त्यानंतर पथकाकडून नगरपालिका शाखेकडील आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू करण्यात आली.

inquiry report file Photo
Viksit Bharat Sankalp Yatra: ‘विकसित भारत संकल्प’ रथ रोखल्याप्रकरणी देवळा गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस

त्यात नगरपालिकांकडून आलेले कामांचे आर्थिक प्रस्ताव, बिले, निधी वितरणासह नगरपालिकांना मागणीनुसार निधी मिळाला का, याची खातरजमा केली जात आहे. चौकशी पूर्ण झाली असून, अहवाल अंतिम करण्याचे काम सध्या सुरू आहे.

संयुक्त अहवाल निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी अप्पर जिल्हाधिकारी पारधे यांना सादर केला आहे. हा अहवाल आता जिल्हाधिकारी शर्मा यांना सादर करण्यात येईल. त्यानंतर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

inquiry report file Photo
Nitesh Rane: साने गुरुजी संस्थेला त्रास दिल्यास गाठ आमच्याशी; आमदार नीतेश राणे यांचा इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com