
एचपीटी महाविद्यालयात बहुमाध्यमी पत्रकारिता कार्यशाळा संपन्न
नाशिक : एचपीटी आर्टस्- आरवायके सायन्स महाविद्यालयातील नामदार गोपाळकृष्ण गोखले पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विभागाच्या वतीने 'बहुमाध्यमी पत्रकारिता' या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. रामनाथ गोयंका पत्रकारिता पुरस्कार विजेत्या पत्रकार आरती कुलकर्णी यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीचे महासंचालक तथा सचिव सर डॉ. एम. एस. गोसावी यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २९) कार्यशाळेचे उद्घाटन झाले. बहुमाध्यमी पत्रकारिता ही काळाची गरज असून, त्यादृष्टीने पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे तसेच बदलाच नेतृत्व करणं गरजेचं आहे असे प्रतिपादन याप्रसंगी सर डॉ. गोसावी यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांनी कार्यशाळेचे महत्व विशद केले. विभागाच्या समन्वयक डॉ. वृन्दा भार्गवे यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. याप्रसंगी रामनाथ गोयंका पत्रकारिता पुरस्कार विजेते तथा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी अनिकेत साठे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपप्राचार्या डॉ. मृणालिनी देशपांडे, उपप्राचार्य डॉ. प्रणव रत्नपारखी, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. आनंदा खलाणे या मान्यवरांसह कार्यशाळेत सहभाग घेतलेले विद्यार्थी उपस्थित होते.
आरती कुलकर्णी यांनी या कार्यशाळेमध्ये डिजिटल, दृश्य आणि मुद्रित माध्यमांसाठी आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात करण्याची तंत्रे प्रात्यक्षिकांसह विद्यार्थ्यांसमोर सादर केली. डिजिटल आणि सोशल मीडियाचा वापर, लेखन, चित्रीकरण, संपादन अशा विविध विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे यशस्वीतेसाठी प्रा. रमेश शेजवळ, प्रा. मार्मिक गोडसे, बी. जी. खैरनार, अभिजीत धोत्रे, अक्षत दोरकुळकर, लतिका लोहगावकर, अश्विनी भालेराव, मानसी चव्हाण, तेजस्विनी वाणी, भारती आहुजा आदींनी परिश्रम घेतले.