esakal | दीडशे किलोमीटरचा प्रवास अन् प्लाझ्मा दानातून शिक्षकाने ओतला ‘प्राण’!

बोलून बातमी शोधा

teacher plazma
दीडशे किलोमीटरचा प्रवास अन् प्लाझ्मा दानातून शिक्षकाने ओतला ‘प्राण’!
sakal_logo
By
राजेंद्र दिघे

मालेगाव कॅम्प (जि.नाशिक) : सर्वत्र गंभीर परिस्थिती आहे. जवळची माणसं कोरोना रुग्णापासून दुरावताना माणुसकी नावाचे नाते उपयुक्त ठरत आहे. आपल्या मदतीने कोणाचे प्राण वाचवता येणे, हे मोठे सत्कर्म. सामोडे (ता. साक्री) येथील साने गुरुजी प्राथमिक विद्यामंदिरचे शिक्षक कुणाल बेनुस्कर यांनी दीडशे किलोमीटरचा प्रवास करून प्लाझ्मा दानातून ‘प्राण’ ओतला.

हेही वाचा: गाजरवाडीची कृषिकन्या गाजवणार युद्धभूमी! बनली तालुक्यातील पहिली महिला फौजी

आईचे प्राण वाचल्याची जाणीव

मालेगाव येथे कोरोनाबाधित महिलेची प्रकृती गंभीर होती. या रुग्णास बी पॉझिटिव्ह प्लाझ्माची तातडीची गरज असल्याचे अनिल शिंदे यांनी बेनुस्कर गुरुजींना कळविले. क्षणाचाही विलंब न करता शिंदे यांच्या वाहनाने मध्यरात्री मालेगाव गाठून प्लाझ्मा देत आदर्शवत बांधिलकी जपली. कोरोना रुग्णांना जीवदान देण्यासाठी प्लाझ्मा थेरेपी परिणामकारक ठरत असल्याने प्लाझ्माचे दान महत्त्वाचे ठरत आहे. बेनुस्कर यांच्या आईवर असा प्रसंग ओढवलेला होता. त्या वेळी प्लाझ्माने आईचे प्राण वाचल्याची जाणीव होती. या प्रसंगात आपलेही कर्तव्य असल्याची प्रेरणा शिंदे यांच्याकडून मिळाली. प्लाझ्मा दान करून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला. कोरोनातून मुक्त झालेल्यांना प्लाझ्मा दान करून प्राण वाचविण्यास मदत करता येते. कोरोनायोद्धा म्हणून सेवा बजावत असल्याने सोशल मीडियासह ग्रामस्थ, शिक्षकांनी बेनुस्कर गुरुजींचे कौतुक केले आहे.

हेही वाचा: ९३ वर्षांच्या योद्धयाचा कोरोनावर विजय! निराशेच्या वातावरणात सकारात्मकतेची पेरणी

''खरंतर कोरोनाच्या पहिल्या लाटेतील कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मा दानासाठी पुढे येण्याची गरज आहे. आपल्या मदतीने कोणाचे प्राण वाचणार असतील तर कुठलीही भीती न बाळगता प्लाझ्मा दान करा.'' -कुणाल बेनुस्कर, प्लाझ्मा दानकर्ते शिक्षक