esakal | गाजरवाडीची कृषिकन्या गाजवणार युद्धभूमी! बनली तालुक्यातील पहिली महिला फौजी

बोलून बातमी शोधा

Sayali Gajare
गाजरवाडीची कृषिकन्या गाजवणार युद्धभूमी! बनली तालुक्यातील पहिली महिला फौजी
sakal_logo
By
माणिक देसाई

निफाड (जि. नाशिक) : सध्या संपूर्ण देशामध्ये कोरोनाने हाहाकार घातला आहे. लोक घराबाहेर पडताना घाबरत असताना नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील गाजरवाडी येथील कृषिकन्या सायली बाळासाहेब गाजरे हिने युद्धभूमी गाजवण्याची तयार केली आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता देश रक्षणाकरीता सीमेवर निघाली आहे. देश सेवेसाठी सायलीने आर्मी जॉईन केली असून, या बिकट परिस्थितीत देशसेवेत रुजू होणारी सायली निफाडची पहिली तरुणी ठरली आहे.

जिद्दीचं सर्वत्र कॉतुक..

निफाड तालुक्याच्या गाजरवाडी या शेतीप्रधान गावात आपल्या कुटुंबासोबत काळ्या आईची सेवा करणाऱ्या सायली गाजरे हिने देशसेवेसाठी कठोर मेहनत करत कुठल्याही परीस्थितीत आर्मीत दाखल व्हायचंच असा चंग बांधला. निफाड येथील अकॅडमीचे संचालक असीम शेख यांनी सायलीकडून भरपूर सराव करून घेतला. तिच्या जिद्द आणि चिकाटीमुळे ती सराव करताना सर्व मुलींपेक्षा पुढे होती. सराव झाल्यानंतर दिवसभर अभ्यास करून घरी शेतीकाम करायची. २०१९ साली तिने आर्मीचा फॉर्म भरला व सहा महिन्यानंतर तिला मैदानी चाचणीसाठी हॉल तिकीट आले. नाशिक येथील सीआयएसएफ युनिटमध्ये पहाटे चारला सुरवात झालेल्या मैदानी चाचणीत शंभर मुलींमध्ये सायलीने पहिला क्रमांक मिळवला. एका शेतकऱ्‍याच्या मुलीने जिद्दीची जोरावर निफाड तालुक्यातील पहिली महिला फौजी होण्याचा बहुमान मिळवला. तिच्या या जिद्दीबद्दल अनेकांनी कौतूक केले.

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..शेती अन्‌ मातीशी नातं सांगणाऱ्या माझ्या बहिणीची सैन्यदलात झालेली निवड आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आधी सायलीला लष्करात जाण्यासाठी विरोध होता. परंतु, ध्येय आणि जिद्दीमुळे तिचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आम्हाला आनंद आहे.
- स्वप्नाली गाजरे, बहीण

हेही वाचा: नाशिकमध्ये रेमडेसिव्‍हिरचा पुन्हा काळाबाजार; पाच इंजेक्शनसह वॉर्डबॉय गजाआड