Advay Hire Fraud Case: अद्वय हिरे यांना न्यायालयीन कोठडी

Advay Hire Fraud Case
Advay Hire Fraud Caseesakal

मालेगाव : शिवसेना (उबाठा) उपनेते अद्वय हिरे यांना आज येथील न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून रेणुका यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था कर्ज फसवणूक प्रकरणाच्या आरोपावरुन ते गेले आठ दिवस पोलिस कोठडीत होते.

न्यायालयाने यापुर्वी त्यांना प्रारंभी पाच दिवस व त्यानंतर २३ नोव्हेंबरपर्यंत (तीन दिवस) पोलिस कोठडी दिली होती. गुरुवारी (ता. २३) पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आज दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायाधीश एस. बी. बहाळकर यांनी त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. (Judicial custody of Advay Hire in fraud case of District Central Cooperative Bank nashik crime)

श्री. हिरे यांच्यातर्फे युक्तीवाद करण्यासाठी आज प्रसिध्दी विधीतज्ज्ञ ॲडव्हाेकेट असीम सरोदे येथील न्यायालयात दाखल झाले होते. नाशिक ग्रामीणचे आर्थिक गुन्हे शाखेने आज त्यांना न्यायालयात हजर करतांना रिमांड रिपोर्टमध्ये न्यायालयीन कोठडीची मागणी केल्याने युक्तीवादाची आवश्‍यकता भासली नाही.

न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर श्री. हिरे यांच्या जामीनासाठी तात्काळ अर्ज करण्यात येईल. त्यांना जामीन मिळेल. मुळात हा गुन्हा फौजदारी स्वरुपाचा नाही. राजकीय षडयंत्र असल्याने या गुन्ह्यात त्यांना अडकविल्याचे श्री. सरोदे यांनी सांगितले.

दरम्यान श्री. हिरे यांनी जामीन अर्ज दाखल केल्याची नोटीस वगैरे अद्याप सरकार पक्ष अथवा पोलिसांना मिळालेली नाही. या संदर्भात नोटीस मिळाल्यानंतर त्यांच्या जामीनाला विरोध करु असे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वकील ए. आय. वासीफ यांनी पत्रकारांना सांगितले.

Advay Hire Fraud Case
Dhule Crime News : धक्का लागल्याने चालकास मारहाण; 13 जणांवर गुन्हा दाखल

शुक्रवारी (ता. २४) श्री. हिरे यांच्यातर्फे अपर सत्र जिल्हा न्यायाधीश यु. एस. बघेले यांच्या न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यात येणार असल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.

"अद्वय हिरे यांच्या संदर्भातील गुन्हा राजकीय उद्देशाने प्रेरीत कायद्याचा व पोलिसांचा गैरवापर करुन असंवैधानिक पध्दतीने करण्यात आला. कायद्याच्या गैरवापरामुळे समाजात चांगला संदेश जाणार नाही. राजकीय नेत्यांनी असा गैरवापर करणे चुकीचे आहे. या गुन्ह्यात नको ती कलमे लावली आहेत. एमपीआयडी कायदा लागू होत नाही. हे फौजदारी प्रकरण नाही. आज पोलिसांनी स्वत:च न्यायालयीन कोठडीचा अहवाल दिल्याने न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. श्री. हिरे यांना लवकरच जामीन मिळेल."- ॲडव्होकेट असीम सरोदे, प्रसिध्द विधीतज्ज्ञ

Advay Hire Fraud Case
Jalgaon Crime: एमआयडीसी पोलिसांच्या नाकर्तेपणात ‘एलसीबी’ने मारली बाजी; संशयित ‘साहेबा'मुळे निसटले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com