नाशिक : जंक्शन पुनर्विकासात अतिक्रमणाचा अडथळा

स्मार्ट सिटीतर्फे प्रस्तावित जंक्शन पुनर्विकास करावयाचा झाल्यास केवळ ट्रायल रन घेऊन उपयोग होणार
Junction redevelopment Of encroachment Obstacle
Junction redevelopment Of encroachment Obstaclesakal

जुने नाशिक : रविवार कारंजा परिसरात वाहतूक बेटाच्या चारही बाजूने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले आहे. जंक्शन (Junction) पुनर्विकासात याच अतिक्रमणाचा अडथळा निर्माण होत आहे. ट्रायल रनदेखील यामुळे विवादात सापडला आहे.

स्मार्टसिटी (Smart City) अंतर्गत जंक्शन (वाहतूक बेट) पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासंदर्भात रविवार कारंजा आणि दिंडोरी नाका येथे काही दिवसापासून ट्रायल रन घेतला जात आहे. येथे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले आहे. अनधिकृत रिक्षा थांबे, रस्त्यावर बसणारे व्यावसायिक, फेरीवाले, तसेच काही स्थानिक व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानापुढे वाढविलेले अतिक्रमण अशा विविध प्रकारच्या अडथळ्यांमुळे रविवार कारंजा परिसरातील भाग अरुंद झाला आहे.

Junction redevelopment Of encroachment Obstacle
DYSP गायकवाड म्हणतात, अनेक अपयशांनंतर वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण!

स्मार्ट सिटीतर्फे प्रस्तावित जंक्शन पुनर्विकास करावयाचा झाल्यास केवळ ट्रायल रन घेऊन उपयोग होणार नाही. त्यासाठी प्रथमतः परिसरातील अतिक्रमण हटविणे तसेच अनधिकृत रिक्षा थांबे तेथून स्थलांतरित करणे आवश्यक झाले आहे. महापालिकेकडून आणि स्मार्टसिटी अधिकाऱ्यांकडून येथील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करून अचानक ट्रायल रनचे आयोजन करण्यात आले. वाहतूक बेटाच्या चारही बाजूने गोलाकार मातीने भरलेल्या गोण्या ठेवत जंक्शनचा भाग वाढविण्यात आला.

Junction redevelopment Of encroachment Obstacle
"अमरावती सारखा प्रयत्न राज्यात पुन्हा झाला तर..."; राज ठाकरे आक्रमक

वाहनांना ये- जा करताना जंक्शनला वळसा मारत असताना अडचणींस सामोरे जावे लागत आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीदेखील झाली. अनेक अपघातदेखील घडले. ट्रायल रनबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. भविष्यात जंक्शन पुनर्विकास होणे आवश्यक आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. शिवाय शहराच्या सुंदरतेतदेखील वाढ होणार आहे. हे करत असताना प्रथमतः महापालिका आणि स्मार्टसिटीतर्फे या भागातील अतिक्रमण हटविणे त्याचप्रमाणे अनधिकृत रिक्षा थांबे स्थलांतरित करणे काळाची गरज झाली आहे. त्यामुळे परिसर मोठा होऊन वाहतूक कोंडी थांबेल. त्याचबरोबर वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करणेदेखील तितकेच आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com