DYSP गायकवाड म्हणतात, अनेक अपयशांनंतर वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण!
DYSP गायकवाड म्हणतात, अनेक अपयशांनंतर वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण!esakal

DYSP गायकवाड म्हणतात, अनेक अपयशांनंतर वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण!

DYSP गायकवाड म्हणतात, अनेक अपयशांनंतर वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण!
Summary

आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करा, तुमची स्वप्ने आपोआपच पूर्ण होतील म्हणतात ते उगीच नव्हे.

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करा, तुमची स्वप्ने आपोआपच पूर्ण होतील म्हणतात ते उगीच नव्हे. याची प्रचिती राहुल गायकवाड (Rahul Gaikwad) यांच्याकडे पाहिल्यानंतर येते. राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत सतत अपयश येऊन देखील, वडिलांनी दाखवलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी हार न मानता, स्वतःला सिद्ध करत चौथ्या प्रयत्नात पोलिस उपअधीक्षक (Deputy Superintendent of Police) पदाला गवसणी घातली आहे. त्यांची ही प्रेरणादायी यशोगाथा (Success Story). (After many failures Rahul Gaikwad became DYSP in the fourth attempt)

DYSP गायकवाड म्हणतात, अनेक अपयशांनंतर वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण!
मंत्रिपदाच्या शर्यतीतून आमदार प्रणिती शिंदे बाहेर?

मूळ गाव उंबरेपागे (ता. पंढरपूर) (Pandharpur) येथील. आई गृहिणी तर वडील अकलूज (Akluj) येथील शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात (Shankarrao Mohite-Patil College) माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असल्याने, संपूर्ण कुटुंब तेथेच स्थायिक झाले. त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अकलूजमध्ये तर पदवीचे शिक्षण कोल्हापूर (Kolhapur) येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधून पूर्ण केले. आई- वडिलांनी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केल्याने राहुल गायकवाड हे यशाचे शिखर पार करू शकले. त्याला कारणही तसेच आहे. लहानपणापासूनच वडिलांची इच्छा होती की, आपल्या मुलांनी प्रशासनातील अधिकारी म्हणून काम करावे. त्यामुळे ते सतत त्या दृष्टीने मार्गदर्शन करत असायचे. विविध अधिकाऱ्यांचे अनुभव कथन ते प्रेरणादायी वाटतील असे सांगायचे.

त्यामुळे राहुल यांचे शालेय जीवनापासून एकच ध्येय होते, ते म्हणजे वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे. त्यातून एक चांगली नोकरीही मिळणार होती. अन्‌ प्रशासनात राहून समाजसेवा करण्याची एक संधी असते. त्यामुळे आपण यातच करिअर (Career) करायचे, हे मनाशी पक्कं केलं होतं. बारावीनंतर स्पर्धा परीक्षा करण्याची इच्छा असताना देखील, स्पर्धा परीक्षा हे अनिश्‍चितीचे क्षेत्र असल्याने, हातात एखादी चांगली पदवी असावी या हेतूने त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजला (Engineering College) प्रवेश घेतला. कॉलेज जीवनातील सर्व मौज-मजा करत इंजिनिअरिंग चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षापासून स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न सुरू केला. या काळात बरेच सीनिअर मित्र भेटले. त्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी असणाऱ्या सर्व गोष्टींबाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे राहुल यांची या क्षेत्रातील जडणघडण चांगल्याप्रकारे झाली.

DYSP गायकवाड म्हणतात, अनेक अपयशांनंतर वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण!
दहावी-बारावीच्या 25 टक्‍के अभ्यासक्रमाला कात्री!

इंजिनिअरिंग पूर्ण होताच स्पर्धा परीक्षेच्या (Competitive Exams) पुण्यातील (Pune) अभ्यासिका केंद्रात अभ्यास सुरू केला. परंतु कोल्हापुरात चांगले मन रमत असल्याने, तेथील वातावरणाची सवय लागल्याने, पुणे सोडून कोल्हापूर गाठले. मनात आत्मविश्वास इतका घट्ट झाला होता की, अभ्यास व आत्मविश्वासाच्या जोरावर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) वतीने एका वर्षात घेतलेल्या जवळपास 6 ते 7 परीक्षा पहिल्या प्रयत्नात देऊन, पूर्व परीक्षेत यश संपादन केले होते. त्यामुळे यश खूप दूर नाही, असे वाटत असतानाच अंतिम निकालात एकाही परीक्षेत यश मिळाले नाही. यशाच्या शिखरावर पोचत असताना अचानक पायथ्याशी आल्याने, थोडे निराश झाले. परंतु स्वतःचे खच्चीकरण होऊ दिले नाही. आई- वडिलांचे मानसिक, आर्थिक संपूर्ण पाठबळ या काळात होते.

मग राहुल यांनी पुन्हा नव्या उमेदीने अभ्यासाला सुरवात केली. मुलाखतीपर्यंत मजल मारली. परंतु अपेक्षित यश संपादन करता आले नाही. सलग दोन वेळा अपयश आल्यानंतर जिद्द मात्र कधीही सोडली नाही. हार न मानता संयम बाळगून, मागील चुकांची दुरुस्ती करून, पुन्हा परीक्षेला सामोरे गेले अन्‌ अखेर तिसऱ्या प्रयत्नात राज्यसेवेतून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली. प्रशिक्षण घेऊन उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात कळंब पंचायत समितीवर गटविकास अधिकारी म्हणून हजर झाले. परंतु अपेक्षित यश मिळाले नसल्याने, प्रयत्न सुरू होते. नोकरीचा कार्यभार सांभाळत चौथ्या प्रयत्नात राज्यसेवेतून पोलिस उपअधीक्षक म्हणून निवड झाली. इतक्‍या अपयशांना सामोरे जाऊन या स्पर्धा परीक्षेत टिकणे सोपे नव्हते, परंतु वडिलांनी दाखवलेल्या निरागस स्वप्नांचा हा पाठलाग होता. त्यांच्यामुळेच हे यश संपादन करू शकलो, असे राहुल गायकवाड सांगतात. सध्या ते नवी मुंबई येथे सहाय्यक पोलिस आयुक्त (Assistant Commissioner of Police) म्हणून कार्यरत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com