नाशिक- मामाकडे राहत असलेल्या भाच्याला आयफोनची हौस असल्याने, ही हौस भागविण्यासाठी त्याने घरातीलच दागिने चोरून ॲपल फोन खरेदी केला आणि पैशातून मौजमजा सुरू केली. संशयित विधीसंघर्षित भाच्यासह त्याच्या तिघा मित्रांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने ताब्यात घेतले असून, याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.